AHMEDNAGAR | आमदार संग्राम जगताप यांचे खासगी स्वीय साहाय्यक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईलवर टेक्स्ट मेसेज करून आमदार संग्राम जगताप यांना ‘दो दिन मे खत्म करूंगा’ अशी धमकी बुधवारी (ता. २) रोजी दिली होती. याबाबत सुहास शिरसाठ यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला होता. या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर हे करत असताना त्यांना मिळालेल्या माहितीनुसार अनिस शेख हा तेलंगणा येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.