वाशिम:-वाशिम पोलीस घटकामध्ये जिल्हा पोलीस अधिक्षक श्री अनुज तारे यांनी गुन्हयांना प्रतिबंध होईल याकरीता विशेष प्रतिबंधक उपाययोजना राबविल्या. विशेष माहिमा राबवुन रेकॉर्डवरील व माहितगार गुन्हेगारांवर सतत पाळत ठेवल्या जात आहे. उघडकीस न आलेल्या गुन्हयांना उघडकीस आणण्यावर भर देवुन स्थानिक गुन्हे शाखेला सुचना / आदेश दिले.त्यानुसार मोटार सायकली चोरी करणारा सराईत गुन्हेगार योगेश अशोक गिरी, वय २४ वर्ष, रा. लाखाळा वाशिम याने त्याचा साथीदार विष्णुदास चंद्रकांत झाटे, वय २५ वर्ष, रा. पिंपळगांव ता. मंगरुळपीर यांनी वाशिम व इतर ठिकाणा वरुन मोटर सायकल चोरी केल्याची खात्री पटल्याने सदर इसमांना सापळा रचुन ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी एकुण ०७ मोटार सायकली चोरी केल्या बाबत सांगीतले. त्यांनी सांगीतल्याप्रमाणे सदर ठिकाणी जावुन एकुण ०७ मोटार सायकली ताब्यात घेतल्या. सदर मोटर सायकलचे चेसीस क्रमांक व इंजीन क्रमांकावरुन पडताळणी केली असता मोटर सायकल क्रमांक MH 37 F 6039 पो.स्टे वाशिम शहर अप कं ६९/२०२४ क.३७९ भादंवि व MH 37 D5244 पो.स्टे वाशिम शहर अप.क्रं २७० / २०२४ क. ३७९ भादंवि मधील चोरी गेलेल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे.सदर कारवाई मा. श्री अनुज तारे, पोलीस अधिक्षक वाशिम, मा. श्रीमती लता फड, अपर पोलीस अधिक्षक, मा. श्री नवदीप अग्रवाल, सहायक पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, श्री पदीप परदेशी, सपोनि जगदिश बांगर, सपोनि.योगेश धोत्रे, अंमलदार विनोद सुर्वे, गजानन अवगळे, प्रविण सिरसाट, प्रशांत बक्षी महेश वानखेडे, संदीप दुतोंडे, अमोल इरतकर, अविनाश वाढे, गोपाल चौधरी, विजय नागरे, दिपक घुगे, संतोष वाघ, सुनील तायडे सर्व स्थागुशा वाशिम यांनी सतत परिश्रम घेवुन गोपनिय माहिती मिळवुन केलेल्या तांत्रीक तपासामुळेच गुन्हे उघडकीस आले आहेत, याबाबत वरीष्ठ पातळीवर सुध्दा दखल घेण्यात आली आहे.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206