WASHIM | आपली लेक सरकारी नोकरीत चांगल्या पदावर असावी असे स्वप्न पाहणार्या मंगरुळपीर येथील सामाजीक कार्यकर्ते गजानन मारोती मोरे यांचा अकाली मृत्यु झाला परंतु वडिलांनी बघीतलेले स्वप्न सत्यात साकारायचे कोमलने ठरवले आणी अवघ्या काही महिन्यातच कृषी सेवकक पदाला गवसनी घालुन कोमल गजाजन मोरे या मुलीने यश संपादन केले.
घरची परिस्थीती जेमतेम…..डोक्यावरुन छञ हरवलेलं….अशा परिस्थीतीत संपुर्ण कुटुंबाची परिस्थीती शांता गजानन मोरे या आईवर तरीही अशा बिकट परिस्थीतीत न डगमगता मंगरुळपीर येथील कोमल गजानन मोरे या मुलीने आपल्या वडिलाचे अखेरचे स्वप्न पुर्ण करण्याचा ध्यास मनी बाळगत आणि तो ध्यास तडीस नेला.नुकत्याच जाहीर झालेल्या कृषी सेवक पदाचे यश कोमलने पदरी पाडल्याने तिचे सर्वञ कौतुक होत आहे.गजाजन मोरे यांनी आर्थिकदृष्ट्या अडचणींना सामोरे जाऊन आपल्या मुलीचे शिक्षण पूर्ण केले.पण आजारपणाने वडिलाचे छञ हरवले.

आपल्या वडिलांची आपल्याला शिक्षणासाठी असलेली मेहनत पाहून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द मनात ठेवूनच कोमलने अभ्यास चालू ठेवला आणि चांगले मार्क्स मिळवून कृषी सेवक पदाची नोकरी मिळवली.तिच्या या अशाबद्दल सन्मान सोहळा मंगरुळपीर लगतच्या शहापुर येथील बुध्द विहारात समस्त गावकर्यांच्या आणी महिलांच्या वतीने घेण्यात आला.परिस्थीतीशी दोन हात करत आईवडीलांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी जिद्द चिकाटी व मेहनतीने वाटचाल करावी व मुलींनीही सर्व क्षेञात आपली प्रतिमा ऊंचवावी असे आवाहन यावेळी कोमल मोरे यांनी ऊपस्थीतांना केले.
फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो. 8459273206