मराठवाडा शिवसेना सचिव ॲड.अशोक पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाप्रमुख मोहन पणूरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.24 रोजी उमरगा लोहारा तालुका शिवसेना पदाधिकारी यांची आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक पार पडली.
या बैठकीत ॲड.अशोक पटवर्धन हे बोलत होते,आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसैनिकांनी शासन राबवित असलेल्या विकासाच्या व लोकहिताच्या योजनांची(वैयक्तिक लाभ, अत्यंत महत्वाचे असलेले आरोग्य विषयक) माहिती घरा-घरापर्यंत पोहोचवण्याचे काम करत लोकांच्या समस्या सोडवत लोकांमध्ये चांगली प्रतिमा व संबंध निर्माण करावे जेणे करून येणाऱ्या सर्व निवडणुका आपल्यासाठी जिंकणे सोयीस्कर होईल असे सांगत पक्ष वाढीसंदर्भात सखोल असे मागदर्शन केले.
या बैठकीस उपजिल्हाप्रमुख शब्बीर गवंडी, उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, लोहारा तालुकाप्रमुख जगन पाटील, शेतकरी सेनेचे विलास भगत, शेतकरी सेना उपजिल्हाप्रमुख बलभीम येवते, उपतालुकाप्रमुख व्यंकट पाटील, बी.के.पवार, आप्पासाहेब पाटील, शेखर पाटील, दिपक जोमदे, राजेंद्र शिंदे, लोहारा उपतालुकाप्रमुख परवेज तांबोळी, अनंत बायस, संदीपान बनकर, परमेश्र्वर साळुंखे, शेतकरी सराव तालुकाप्रमुख जितेंद्र सूर्यवंशी, मुरूम शहरप्रमुख सुरेश मंगरुळे, माजी गटनेते अभिमान खराडे, लोहारा नगरसेवक अमीन सुंबेकर, प्रमोद बंगले, ओम कोरे, आरीफ खानापुरे, दिपक रोडगे, विजय ढगे, आयुब शेख, श्रीकांत भरारे, व उमरगा माजी नगरसेवक संतोष सगर, प्रताप लोभे, हनमंत गुरव, विनोद मुसांडे, अरुण जगताप, नाना मदनसुरे, जितेंद्र कदम, दत्ता डोंगरे, सुरेश दंडगुले, विनोद इंगळे, नागेश गायकवाड, खय्युम चाकुरे, पतंग पवार आदी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
