WASHIM | मंगरुळपीर शहरातील धार्मिक स्थळांवरील अनाधिकृत भोंगे हटविले जाणार असून, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, सर्व पोलिस ठाण्यांमध्ये समन्वय बैठका घेतल्या जात आहेत. याबाबतची नुकतीच दि.२६ रोजी बैठक मंगरुळपीर पोलिस स्टेशनमध्ये ठाणेदार कीशोर शेळके आणी सर्व धार्मिक स्थळांचे विश्वस्त यांच्या ऊपस्थीतीत पोलिस ठाण्यामध्ये पार पडली होती.ही बैठक यशस्वी झाली असुन ठाणेदार यांच्या आवाहनाला प्रतीसाद देत धार्मीक स्थळावरील अनधिकृत भोंगे स्वतःहुन हटवले आहे.
परवानगीशिवाय धार्मिक स्थळांवर भोंगे वाजवणे कायदेशीररित्या चुकीचे आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले. तसेच बेकायदेशीरपणे भोंगे वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही पोलिसांनी समन्वय बैठकीमध्ये दिला होता.कुठल्याही प्रार्थनास्थळावर विनापरवानगी भोंगे लावल्यास ते जप्त केले जातील. भोंगे रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत बंद असले पाहिजेत. तसेच सकाळी ६ ते रात्री १० या काळात सकाळी ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबल आवाजाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या नियमांचे सर्वांनाच पालन करावे लागणार आहेत.असेही स्पष्ट करण्यात आले होते.ठाणेदार किशोर शेळके यांच्या आवाहनाला लोकांनी सकारात्मक प्रतिसाद देत स्वतःहुन अनधिकृत असलेले प्रार्थनास्थळावरचे भोंगे हटवणे सुरु केले आहे.जनता आणी प्रशासन यामध्ये समन्वय साधन्यासाठी ठाणेदार शेळके यांचे कार्य मोलाचे ठरत आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *