फुलचंद भगत
वाशिम:-नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.यामध्ये मंगरुळपीर येथील काॅग्रेसचे खंदे समर्थक प्रगल्भ विचाराचे व ऊत्कष्ट संघटन कौशल्य असणारे जावेद अहमद सौदागर यांची महाराष्ट प्रदेश सचिवपदी नियूक्ती केल्याने पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे.
महाराष्ट प्रदेश काॅग्रेस कमीटीची राज्य कार्यकारीनी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये राजकीय व्यवहार समितीत ३६ वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. १६ वरिष्ठ उपाध्यक्ष, ३८ उपाध्यक्ष, ५ वरिष्ठ प्रवक्ते, १०८ सरचिटणीस, ९५ चिटणीस, ८७ नेते कार्यकारी समितीमध्ये आहेत.हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष होऊन जवळपास सहा महिने झाले. मात्र तरीही काँग्रेसची कार्यकारिणी यादी जाहीर झाली नव्हती. सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारी रात्री उशिरा ही यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये बहुतांश जुनेच नेते आहेत. काही ठिकाणी मात्र नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात आले.काॅग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहुन पक्षवाढिसाठी नेहमी प्रयत्नशील असणारे मंगरुळपीर जि.वाशिम येथील निवाशी जावेद अहमद सौदागर यांची या नवनियुक्त कार्यकारीनीमध्ये महाराष्टप्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याने सर्वञ शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.जावेद सौदागर यांनी याआधी काॅग्रेस पक्षामध्ये विविध पदावर काम केले असुन राजकारणाचा दांडगा अनुभव असलेल्या सौदागर यांना यावेळी महत्वपुर्ण पद दिल्याने आता पक्षकामाची जबाबदारी वाढली.मी पक्षाशी सदैव एकनिष्ठ राहुन पक्षवाढिसाठी नेहमी कार्य करीत राहीन असे मत या नियुक्तीवर जावेद सौदागर यांनी व्यक्त केले आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *