निधी लाटन्यासाठी शासनाच्या योजनेला लावला जातोय चुना

मंगरुळपीर तालुक्यातील तपोवन येथील प्रकार

फुलचंद भगत
वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील तपोवन येथे आधीच सिमेंट रस्ता असलेल्या रस्त्यावर थातुरमातुर कोटींग करुन पि.डि.सी.अंतर्गत सुरु असलेल्या रस्त्याचे काम दाखवण्याचा प्रयत्न करुन शासकीय योजनेचा निधी हडप करण्याचा प्रकार होत असल्याची तक्रार तपोवन येथील भाग्येश विनायकराव येवले यांनी सबंधित प्रशासनाकडे केली असुन सदर बोगस काम थांबवुन सबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.


सदर निवेदनात नमुद आहे की,ग्राम तपोवन तालुका मंगरुळपीर जिल्हा वाशिम येथे डी.पी. डी. सी. अंतर्गत सुरु असलेल्या सिमेंट रस्त्याचे काम हे आधीच सिमेंट रस्ता असलेल्या रस्त्यावर थातूरमातूर कोटिंग करून काम केल्याचे दाखविण्याचा प्रयत्न होत आहे. सदर रस्ता हा गाव जोडण्यासाठी असून आवश्यक त्या ठिकाणी रस्ता न करता कमी खर्चात होण्याकरिता ज्या ठिकाणी यापूर्वी सिमेंट रस्ता झालेला आहे त्याच ठिकाणावर कोटींग करण्यात येत आहे. तसेच गावकल्यांच्या उपयोगासाठी ज्या ठिकाणावरुन रस्ता व्हायला पाहिजे त्या ठिकाणाला बगल देऊन अनधिकृत पणे मनमानी करून सदर रस्त्याचे काम सुरू आहे, आणि यामध्ये प्रशासनातील अधिकारी सुद्धा सामील आहेत,तरी सदर काम तात्काळ थांबवून कामाचे ठिकाण व दर्जा निश्चित करून पुन्हा कामास सुरुवात करावी आणी सदर कामाची चौकशी करुन शासकीय निधीवर डल्ला मारणारांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भाग्येश विनायकराव येवले यांनी लेखी निवेदनाव्दारे केली असुन या निवेदनाच्या प्रति सर्व सबंधित विभागांना पाठवल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *