जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी यावल सोसायटी मतदारसंघातून माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीतील चुरस वाढण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी यावल सोसायटी मतदारसंघातून माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

जिल्हा बँकेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे त्यांनी हा अर्ज सादर केला. विरावली येथील सतीश रघुनाथ पाटील हे त्यांचे सूचक, तर कासवा येथील मीराबाई संजय सपकाळे या अनुमोदक आहेत.

नामांकन दाखल करताना यावलच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा छायाताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. देवकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार, गोलू माळी यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

अतुल पाटील यांच्या उमेदवारीमुळे यावल सोसायटी मतदारसंघातील निवडणुकीत चुरस वाढण्याची शक्यता असून, त्यांच्या उमेदवारीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *