यावल शहरातील छत्रपती शिवाजीनगर किल्ला परिसरातील २९ वर्षीय तरुणाचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
यावल शहरातील छत्रपती शिवाजीनगर किल्ला परिसरातील रहिवासी नारायण आत्माराम उर्फ गोविंदा नकाते (वय २९) या अविवाहित तरुणाचा मृतदेह सुभाष चौधरी यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला.
शुक्रवारी ही घटना उघडकीस आली. मृतदेह विहिरीत दिसल्यानंतर नागरिकांनी तातडीने यावल पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढून यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
या प्रकरणी रामू आत्माराम उर्फ गोविंदा नकाते यांच्या खबरीवरून यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
