जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील दहिगाव येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला.

दहिगाव येथील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले.

यावेळी दहिगाव केंद्राचे केंद्रप्रमुख विजय ठाकूर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवेंद्र महाजन, उपाध्यक्षा आशाताई सूर्यवंशी, दिनेश पाटील आणि समितीच्या सर्व सदस्यांच्या हस्ते फराळाचे वाटप करण्यात आले.

यावेळी शिक्षक पंकज पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिवाळीचे महत्त्व सांगितले. तसेच शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विजय पाटील, सोनाली चौधरी, विमल बारेला आणि रामेश्वरी बडगुजर उपस्थित होते.

फराळ मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि हास्य फुलले. या उपक्रमाचे गावातील पालकांकडून स्वागत केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *