यावल तालुक्यातील दहिगाव येथे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती विविध ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. श्रीराम मंदिरासह शाळा आणि ग्रामपंचायत कार्यालयात प्रतिमापूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावल तालुक्यातील दहिगाव येथे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती विविध ठिकाणी साजरी करण्यात आली.
दहिगाव येथील श्रीराम मंदिरासमोर, आदर्श विद्यालय दहिगाव, जिल्हा परिषद शाळा तसेच ग्रामपंचायत कार्यालयात जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
श्रीराम मंदिरात सर्वप्रथम सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी माहिती विशद केली.
या प्रसंगी मनोहर रामकृष्ण महाजन, जितेंद्र त्र्यंबक पाटील, किशोर गंभीर महाजन, भुवनेश्वर तुकाराम महाजन, दिलीप प्रभाकर सरोदे, उल्हास अशोक महाजन, किरण वसंत महाजन, गौरव जनार्दन महाजन, योगेश महाजन, विशाल महाजन आणि सेजल महाजन यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
