जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील दहिगाव येथील तरुणाने आपल्या मेहनतीच्या जोरावर यशाला गवसणी घातली आहे. चेतन भूषण पाटील यांची मर्चंट नेव्हीमध्ये इलेक्ट्रॉनिक टेक्निकल ऑफिसर पदावर नियुक्ती झाली असून, त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावल तालुक्यातील दहिगाव येथील चेतन भूषण पाटील या तरुणाची नुकतीच मर्चंट नेव्हीमध्ये इलेक्ट्रॉनिक टेक्निकल ऑफिसर पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या शैक्षणिक प्रवासातून त्यांनी हे यश संपादन केले आहे.

चेतन पाटील यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण दहिगाव येथील आदर्श विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी चोपडा येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर अल्पावधीतच त्यांनी मर्चंट नेव्हीमध्ये इलेक्ट्रॉनिक टेक्निकल ऑफिसर पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या या यशाबद्दल दहिगावसह परिसरातून त्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *