डांग सेवा मंडळ संचालित डॉ. विजय बिडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अभोणे येथे अर्थशास्त्र विभागाच्या वतीने ‘शाश्वत शेती दिन’ साजरा करण्यात आला. हरितक्रांतीचे प्रणेते एम. एस. स्वामिनाथन यांच्या कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरीला अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिन ७ ऑगस्ट हा दरवर्षी ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमात डॉ. एस. आर. थोरवत व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. के. मगरे यांनी शाश्वत शेतीचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा मोरे यांनी केले तर आभार कौशल्या ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ. रवींद्र पगार, प्रा. निकिता पवार प्रा. पूजा भालेराव , प्रा .अहिरराव तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रतिनिधी अनिल पवार कळवण नाशिक