NASHIK :
- येवला शहर पोलिसांची मोठी कारवाई.
- लक्झरी बसमधून गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात.
- चार किलो गांजा जप्त.
- अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले.
नाशिक ग्रामीण अंतर्गत येणाऱ्या येवला शहर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिवसृष्टी येवला समोर सापळा रचून लक्झरी बसच्या माध्यमातून गांजाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना चार किलो गांजा सह ताब्यात घेतले आहे.

या कारवाईमुळे शहरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून गांजाची तस्करी, गांजा विक्री तसेच अवैध धंदे करणाऱ्यांची गय केली जाणार नाही अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी दिली आहे.
एनटीव्ही न्यूज मराठी,नाशिक
