जाफराबाद शहरातील नामांकित असलेल्या सिद्धार्थ नगर येथील लुंम्बुनी बुद्ध विहारात श्रद्धावान उपासक आयु.सौ.सरला विजय(फौजी) बोर्डे यांच्या वतीनं वर्षावासात येणारी श्रावण पौर्णिमा संविधान ग्रंथ वाटप करुन साजरी करण्यात आली.सिध्दार्थ नगर येथील लुंम्बुनी बुद्ध विहारात वर्षावास सुरु झाल्या पासून आमच्या नगरातील माता भगिनीं यांनी दरवर्षी “बुद्ध आणि त्यांचा धम्म” या ग्रंथाचे वाचन करण्याचा निर्णय घेतला.दररोज संध्याकाळी तीस-पस्तीस महिला ग्रंथ वाचनास नित्यनेमाने उजपस्थित राहुन बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण करतात.याच निम्मिताने बोर्डे परिवाराच्या वतीनं जाफराबाद नगरपंचायतीच्या माजी नगरसेविका सौ.प्रमिला अनिल बोर्डे यांनी पन्नास संविधान ग्रंथ वाटप करुन महिलांना भारताचे संविधान वाचून सक्षम व्हावे असे आव्हान केले.त्यांनी सर्वांशी बोलतांना सांगितले की,याच संविधानामुळे मला नगरसेविका होता आले.आज रक्षा बंधन श्रावण पौर्णिमा असल्यामुळे प्रत्येक माझ्या भगिनींनी हा ग्रंथ वाचावा व आपल्या अधिकार आणि कर्तव्ये जाणुन घ्यायला पाहिजे तरच आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे व माता रमाई चे अनुयायी शोभू.सिध्दार्थ नगर येथील लुंम्बुनी बुद्ध विहारात सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्रा.अनिल वैद्य हे नित्यनेमाने बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करून सर्व माता भगिनींना सोप्या भाषेत ग्रंथ समजावून सांगण्याचे काम करत आहेत.याच पोर्णिमेच्या निम्मिताने सिद्धार्थ नगर येथील श्रीमती केसरबाई बोर्डे,श्रीमती कमलबाई पारवे,श्रीमती शेनफडाबाई दांडगे ,सौ.कल्पना वैद्य,सौ.सरला बोर्डे,सौ.छाया गायकवाड,सौ.जयश्री वाघमारे,सौ.सुनीता जाधव,सौ.सुनंदा आढावे,सौ.शोभा आढावे,सौ.रेखा आढावे,श्रीमती सिंधुबाई आढावे,सौ.कुसुम राऊत,श्रीमती सिंधुबाई बनकर,सौ.अस्मिता मगरे,सौ.आर्चना मगरे,सौ.मनकरनाबाईभाऊराव लोखंडे,कु.नितीशा बोर्डे, अभिषेक बोर्डे,आयु.दिलीप मगरे,संजय कासारे व सिद्धार्थ नगर येथील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.