JALNA | जालना येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे जालना जिल्हा अध्यक्ष प्रभाकरराव घेवंदे यांनी विधान परिषदेचे उपाध्यक्ष आदरणीय अण्णा बनसोडे साहेब यांचा संभाजीनगर येथे भेटून हॉटेल रविराज ला सत्कार केला. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील भाऊ मगरे मराठवाडा उपाध्यक्ष सुबोध कुमार जाधव जालना शहर अध्यक्ष सुनील डोळसे अमोल खरात मराठवाडा उपाध्यक्ष गवई साहेब बाबा भोसले प्रदेशचे सहसचिव रमेश पाईकराव परतुर चे तालुका अध्यक्ष प्रभाकर प्रधान शिरसाट मोरे हनुमान दवडे भोकरदन चे तालुका अध्यक्ष प्रमोद सुरडकर गायकवाड आदी मंडळी त्यांच्यासोबत होती. यावेळी श्री घेवंदे यांनी जालना जिल्हा सामाजिक न्याय विभागाचा अहवाल आदरणीय बनसोडे साहेब यांना सांगितला. सामाजिक न्याय विभागाला स्वतंत्र निधीची उपलब्धता करून देण्यात यावी अशी मागणी यावेळी घेवंदे यांनी बनसोडे सरांना केली. विविध शासकीय समित्यांवर सामाजिक न्याय विभागाचे सदस्य घेण्यात यावे. जालना डी पी टी सी वर अशासकीय सदस्य म्हणून प्राधान्यक्रम देण्यात यावा प्रत्येक तालुक्याच्या तालुका अध्यक्षांना विविध शासकीय समित्यांवर सामावून घेण्यात यावे.सामाजिक न्याय विभागासाठी स्वतंत्र फंडाची निर्मिती करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी पक्षाकडे पक्षप्रमुख म्हणून आपण अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील भाऊ तटकरे यांच्याकडे आपल्या मार्फत करावीत अशा मागणीलाही त्यांनी दुजोरा दिला. यावेळी घेवंदे यांच्या कार्याचे आदरणीय बनसोडे साहेब यांनी गुणगौरव केला. आणि जिल्ह्याभरात सामाजिक न्याय विभागाचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे. अशी कौतुकाची थापही दिली. तुमच्या ज्या लक्षवेधी मागण्या आहेत या मागण्या निश्चितच अजितदादा आणि तटकरे साहेबांकडे आपण मांडू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.