जालना: जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) सामाजिक न्याय विभागाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पक्ष कार्यालयात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात जालना जिल्ह्याचे अध्यक्ष प्रभाकरराव घेवंदे, शहराध्यक्ष सुनील डोळसे, शहर कार्याध्यक्ष बाबा भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष अमोल खरात, मराठवाडा उपाध्यक्ष सुबोधकुमार जाधव, प्रदेश उपाध्यक्ष विष्णू गवळी यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा आणि त्यांच्या साहित्याचा गौरव करत, त्यांच्या कार्यामुळे समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकांना मिळालेल्या प्रेरणांवर प्रकाश टाकला. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून समाजात क्रांती घडवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
प्रतिनिधि राहुल गवई,
एनटीव्ही न्यूज मराठी, जाफराबाद, जालना.