जाफराबाद तालुक्यातील अकोला देव,टेंभुर्णी जि.प. सर्कल गटाच्या आढावा बैठकित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना पक्षसंघटन अधिकचे मजबूत करत,गावा- गावात पक्षाच्या शाखा स्थापन करुन कार्यकर्त्यांनो आता पासूनच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकी साठी तयारीला लागा,असे आवाहन शिवसेनेचे संपर्कप्रमुख विनोदजी घोसाळकर यांनी केले. यावेळी पुढे बोलतांना त्यांनी शिवसैनिकांना कान मंत्र देवून याला उमेदवारी द्या त्याला उमेदवारी द्या असा सध्या तरी उतावीळ पणा करू नका.यामुळे तुमचा विरोधक सावध होतो.तुम्हीच मतदार राजा समोर जाऊन कोणतेही मतभेद न होऊ देता, तालुका शिवसेना पदाधिकारी मिळवून उमेदवार ठरवा व नंतरच माझ्याकडे या असा सुचक सल्ला दिला.
यावेळी जालना शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुका जिंकण्यासाठी गटा-तटाचे राजकारण न करता महाविकास आघाडीची निवडणुकीत युती राहील की नाही हे आता तरी सांगता येत नसले, तरी शिवसैनिकांनी निवडणूका जिंकण्याच्या उद्देशाने आता पासुनच तयारीला लागा असेही सांगितले.
यावेळी आढावा बैठकीला उपनेते लक्ष्मण लढले, बदनापूरचे मा. आमदार संतोष सांबरे, महीला संपर्क प्रमुख जोतीताई ठाकरे, जिल्हाप्रमुख महेश नळगे, किसान सेनेचे मुरली आबा थेठे, मंगलाताई मिटकर, शाईन ताई ,गंगुबाई वानखेडे, हरीहर शिंदे, उपजिल्हाप्रमुख रमेश पा.गव्हाड, परमेश्वर जगताप,तालुका प्रमुख कुंडलीक पा.मुठ्ठे, माजी जि.प.अध्यक्ष उत्तमराव वानखेडे,जेष्ठ शिवसैनिक विष्णु म्हस्के, हरीचंद्र पा. म्हस्के,दत्तुभाऊ सुद्रिक, जनार्धन झोरे, माजी सरपंच विष्णूभाऊ जमधडे, माजी प.स.सदस्य रमेश गायकवाड,अकोला देवचे मा. सरपंच रघुनाथ कदम, उपतालुका प्रमुख शिवाजी म्हस्के,शहरप्रमुख देवसिंग बायस, मा.सरपंच नंदू सरडे, मुकेश माकोडे, समाधान चव्हाण, समाधान सवडे, विठ्ठल खुपटे,गजानन मुळे, संतोष घोडसे, गणेश सवडे, कांतीलाल कदम, योगेश शर्मा,गणपत बनकर, प्रल्हाद बनकर, योगेश कापसे, कुंडलिक बनकर, रामेश्वर खांडेभराड, बाबुराव सवडे, राज देशमुख,कृष्णा सवडे, साईनाथ सवडे, सुलतान कुरेशी,समीर शहा,इरफान भाई,मोहम्मद फैसल,अय्युब कुरेशी, यांच्यासह अकोला देव व टेंभुर्णी सर्कल मधील सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *