जाफराबाद, जालना: “मरावे परी कीर्तीरूपी उरावे” या उक्तीप्रमाणे, शिक्षण महर्षी कै. दादासाहेब म्हस्के यांनी मराठवाड्यातील, विशेषतः जालना जिल्ह्यातील सर्वांगीण विकासासाठी आपले जीवन समर्पित केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सतत आधुनिकतेची कास धरून शैक्षणिक गुणवत्ता वाढवता यावी, तसेच शिक्षणाप्रती वाढत असलेली उदासीनता दूर व्हावी, या हेतूने त्यांनी अनेक उपक्रम राबवले. याच विचारातून जाफराबाद शहरातील शिक्षणाचे एकमेव माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना झाली.
सिद्धार्थ महाविद्यालयात शिक्षणाचे वेगवेगळे अभ्यासक्रम तर सुरू आहेतच, पण महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींमध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे, यासाठीही विशेष प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भारतीय संविधानाचे प्रियांबल (उद्देशिका) उभारण्यात आले आहे. हे वैशिष्ट्य मराठवाड्यातील इतर कोणत्याही महाविद्यालयाच्या परिसरात दिसत नाही.
इतकंच नाही तर, आज महाविद्यालयाच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आवारात जशी कारंजी आहेत, तशीच हुबेहूब प्रतिकृती सिद्धार्थ महाविद्यालय, जाफराबादच्या प्रांगणात साकारण्यात आली आहे. हे सर्व दादासाहेब म्हस्के यांच्या दूरदृष्टीचे आणि शिक्षणाप्रती असलेल्या त्यांच्या असीम प्रेमाचे प्रतीक आहे.
अशा महान त्यागी, समाजासाठी आणि समाजातील गोरगरीब जनतेला सतत सहकार्य करणाऱ्या शिक्षण महर्षी मा. दादासाहेब म्हस्के साहेब यांना मानाचा जय भीम! त्यांच्या कार्यामुळे शिक्षण क्षेत्राला नवी दिशा मिळाली असून, त्यांचे स्वप्न सिद्धार्थ महाविद्यालयाच्या रूपाने आजही जिवंत आहे.
प्रतिनिधी राहुल गवई
एनटीव्ही न्यूज मराठी, जाफराबाद (जालना).