जालना :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाचे जालना जिल्हाध्यक्ष प्रभाकरराव घेवंदे यांनी मुंबई मंत्रालयात सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव हर्षदीप कांबळे यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा केली. सामाजिक न्याय विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न आणि विशेषतः विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली, ज्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
या भेटीदरम्यान, घेवंदे यांनी एन.एस.एफ.डी.सी.च्या कर्ज योजना, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, मागासवर्गीय उद्योगधंद्यांसाठीच्या संस्थांचा निधी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर लक्ष वेधले. सध्या मागासवर्गीयांवर कोणीही उठसूठ काहीही बोलून बेछूटपणे शाब्दिक हल्ले करत असल्याबद्दलही त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. मुख्य सचिवांनी या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला आणि याबद्दल लवकरच एका बैठकीचे आयोजन करून मार्ग काढू, असे आश्वासन दिले. या महत्त्वाच्या भेटीप्रसंगी जालना शहर अध्यक्ष सुनील डोळसे हे घेवंदे यांच्यासोबत उपस्थित होते.
प्रतिनिधी राहुल गवई
एनटीव्ही न्यूज मराठी, जाफराबाद (जालना).