जाफराबाद:

महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाफराबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी जाफराबाद येथील उर्दू शाळा आणि प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप करण्यात आले. तसेच, जाफराबाद ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करून त्यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त करण्यात आली.

या वाढदिवस सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष श्री. दत्तूअण्णा अंभोरे, जिल्हा उपाध्यक्ष फारुख कुरेशी, सौ. चांगुणाबाई वायाळ, श्री. बाळकृष्ण हिवाळे, ॲड. सचिन सोरमारे, ॲड. विनोद डिगे, माणिकराव वायाळ, अशोक मस्के, संदीप कड, राहुल गवई, गजानन वायाळ, ज्ञानेश्वर गाडे, आत्माराम गायकवाड, सुरेश जाधव, संतोष वागळे इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त राबवलेल्या या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


प्रतिनिधी राहुल गवई;

एनटीव्ही न्यूज मराठी; जाफराबाद जालना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *