(धाराशिव:सचिन बिद्री)
उमरगा शहरात श्री संत शिरोमणी संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दोन दिवस मंदिरात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. बुधवारी (दि.२०) दुपारी बारा वाजता किर्तनाच्या समारोपात गुलाल पुष्पवृष्टी करण्यात आली.
मंगळवार दि.१९ रोजीच्या रात्री ह.भ.प. महेश पाटील महाराज हिप्परगेकर यांची किर्तन सेवा झाली. या वेळी दुधाराम क्षीरसागर, बालाजी महाराज कोळसूरकर यांच्यासह श्री संत सेना महाराज महिला भजनी मंडळ उपस्थित होते. ”संत सेना महाराज यांची भक्ती महान होती, त्यांच्या ह्दयी भगवान परमात्मा विराजमान झाले होते. संताच्या संगतीत आपण गेलो की सहज भगवंत हाती लागतो. नाभिक समाज शस्त्र व शास्त्र मानणारा समाज आहे. असे ते या वेळी म्हणाले. दरम्यान बुधवारी सकाळी प्रारंभी जयंत अविनाश काळे यांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आले. दहा वाजता कराळी येथील आगजाप्पा (अग्नीबेट) महाराज संस्थानचे तेजनाथ महाराज शास्त्री महाराज यांची किर्तन सेवा झाली. दुपारी बारा वाजता गुलाल पुष्पवृष्टी झाली. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या वेळी माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड, माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, माजी नगरसेवक पंढरीनाथ कोणे, सामाजिक कार्यकर्ते अनिल उर्फ पप्पू सगर, भिम महाराज मुळजकर, सदानंद शिवदे-पाटील यांच्या हस्ते श्री. संत सेना महाराज, विठ्ठल-रुक्मिनी मूर्तीचे पुजन करण्यात आले. श्री.संतसेना महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अविनाश काळे, प्रभारी प्राचार्य डॉ. संजय अस्वले, प्रा.जी.जी. काळे, केशवराव काळे, बालाजी काळे, बलभिम ढगे,आनंदराव काळे, सुखदेव जाधव,नरसिंग सुरवसे,नाभिक संघटनेचे तालुकाध्यक्ष गुरूनाथ विभुते,शहराध्यक्ष प्रदिप चौधरी,उपाध्यक्ष धनराज सुर्यवंशी, कोषाध्यक्ष कुंडलिक सुर्यवंशी, ज्ञानेश्वर सुर्यवंशी,विठ्ठल जवळगेकर,सतीश काळे,संतोष काळे,आकाश काळे,प्रताप मुळे,भास्कर मुळे,गणेश काळे,शिवाजी मुळे,शाम काळे,शिवाजी सुरवसे,महादू मुलगे,गुंडू मुलगे,पिंटू मुलगे,पप्पू मुलगे, अरुण सुरवसे,मंगेश काळे,सतीश सुर्यवंशी,अनिल लोखंडे,उमेश काळे, जितेंद्र काळे, सोमनाथ काळे,ओम मुळे, सारंग सोमवंशी,नागेश मुळे,गोरख सुरवसे, बालाजी माने,अशोक सुर्यवंशी,गोपाळ आतकरे,रवि मुळे, यश काळे, कृष्णा काळे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पुढाकार घेतला.
——–#——#———

किर्तनातून श्री संत सेना महाराज यांची महती
संतसंगतीने थोर लाभ झाला । मोह निरसला मायादिक ॥ घातले बाहेरा काम क्रोध वैरी । बैसला अंतरी पांडुरंगा ॥
दुजियाचा वारा लागूं नेदी अंगा । ऐसे पांडुरंगा कळो आले॥
संतांनीं सरता केला सेना न्हावी । ब्रह्मादिक पाही नातुडे जो ॥ या अभंगातून शास्त्री महाराज यांनी श्री. संत सेना महाराज यांच्या अभंगावर अतिशय सुंदर चिंतन मांडून मंत्रमुग्ध केले. या वेळी दामू चव्हाण, दामू मुगळे यांच्यासह बालभजनी मंडळ उपस्थित होते.