बाळापूर प्रतिनिधी | ०२ फेब्रुवारी

अकोला: “मन चंगा तो कठौती में गंगा” असा समतेचा संदेश देणारे महान संत शिरोमणी रविदास महाराज यांची ६५० वी जयंती बाळापूर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रविदास नगर, लोटनापूर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती

या जयंती उत्सवाचे खास वैशिष्ट्य म्हणजे बाळापूर शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि चर्मकार समाजातील बांधवांनी एकत्र येत महाराजांना अभिवादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक संजय उमाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बाळापूर नगर परिषदेचे माजी अध्यक्ष जम्मू सेठ, उपाध्यक्ष सुरेंद्र धोपटे, चर्मकार समाज शहराध्यक्ष प्रकाश खनसरे आणि कार्याध्यक्ष विशाल हसुलकर यांची उपस्थिती लाभली होती.

मान्यवरांकडून कार्याचा गौरव

यावेळी उपस्थित मान्यवरांनी संत रविदास महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. महाराजांनी दिलेला समता, बंधुता आणि श्रमाची प्रतिष्ठा राखण्याचा संदेश आजही समाजाला दिशा देणारा असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी आपल्या भाषणातून केले.

उपस्थित मान्यवर आणि कार्यकर्ते

कार्यक्रमाला समाजातील प्रतिष्ठित नागरिक आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती, ज्यात प्रामुख्याने पुढील व्यक्तींचा समावेश होता:

आनंद बनचरे, गुलाब उमाळे, गोकुल खजूरे, अजय पदमने, निरंजन कळसकार, बंटी महाराज कानकुब्ज, गणेश भिसे, संजय हसुलकर, अक्षय हसुलकर, भोनाजी ठोंम्बरे, सलमान भाई, मोहन धरमठोक, अशोक राणे, बंटी किलेकर, चेतन खनसरे, श्रीकांत ठोंम्बरे इत्यादी.

नेटके नियोजन

कार्यक्रमाचे अतिशय सुंदर संचालन जयराम सोनोने यांनी केले, तर उपस्थितांचे आभार विशाल हसुलकर यांनी मानले. जयंतीनिमित्त परिसरात उत्साहाचे वातावरण असून चर्मकार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवली.


प्रतिनिधी अमोल जामोदे, बाळापुर, अकोला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *