मंगरुळपीर येथे शांतता समितीची बैठक संपन्न
फुलचंद भगत
वाशिम:-मंगरुळपीर येथील पंचायत समीती सभागृहात आगामी सण, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक पार पडली.या बैठकीत ऊपविभागिय अधिकारी राजेंद्र जाधव,तहसिलदार रविंद्र राठोड,ठाणेदार किशोर शेळके,गटविकास अधिकारी,न.प. आणीृ महावितरणचे धिकारी,पोलीस विभागातील अधिकारी, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते.

गणेशोत्सव काळात शहरातील कायदा-सुव्यवस्था सुरळीत ठेवणे, सुरक्षित व पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करणे, तसेच सर्व मंडळांनी नियमांचे पालन करून भक्तिभावाने सहभागी होणे यावर चर्चा झाली.प्रशासन व नागरिकांच्या सहकार्याने तालुक्यात व मंगरुळपीर शहरात गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहाने साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.तालुक्यात जातीय सलोखा कायम ठेवावा. डिजेमुक्त ऊत्सव साजरा करा.कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट टाकू नये, दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नये. अशा लोकांवर पोलिसांची नजर राहणार आहे. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती ठाणेदार किशोर शेळके यांनी दिली.आगामी सणोत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीत पोलिस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन केले.सदर बैठक दि.२५ आॅगष्ट रोजी पो.स्टे.मंगरुळपीर येथील पंचायत समीती हाॅलमध्ये श्री गणेशोत्सव संबंधाने एसडिओ,तहसिलदार व पोलिस निरिक्षक किशोर शेळके यांचे मार्गदर्शनात शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीमध्ये उत्सव संबंधाने अडीअडचणी विचारून त्यावर मार्गदर्शन करण्यात आले व योग्य त्या सूचना देण्यात आल्या बैठकीला उपस्थित लोकांनी आगामी सण उत्सव शांततेत पार पाडू असे आश्वासीत केले.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206