बिगर सातबारा संघटनेचे भाई जगदिशकुमार इंगळे यांची प्रशासनाकडे मागणी
फुलचंद भगत
वाशिम:-मंगरूळपीर तालुक्यासह वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करून सरसकट मदत जाहीर करण्याकरिता मंगरूळपीर तहसीलदारांमार्फत महाराष्ट्र राज्याचे महसुलमंञी यांना दि.२५ आॅगष्ट रोजी निवेदन दिले.
सदर निवेदनात नमूद केली की,मंगरुळपीर तालुक्यासह जिल्ह्यात दि.१४ ते १८ दरम्यान झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्गावर मोठे संकट कोसळले आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, उडीद आदी पिके पाण्याखाली जाऊन पूर्णपणे नष्ट झाली आहेत. काही ठिकाणी शेतीची सुपीक माती वाहून गेल्यामुळे जमीन खरडून गेली असून पुढील पेरणीयोग्य राहिलेली नाही.शेतकरी वर्ग आधीच कर्जबाजारी असून यंदा बहुसंख्य शेतकऱ्यांनी बँका, पतसंस्था तसेच खासगी सावकारांकडून कर्ज काढून पेरणी केली होती. मात्र या अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांचे सर्वस्व उद्ध्वस्त झाले आहे.मंगरुळपीर तालुक्यातील शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने करण्यात यावेत,तालुक्याला ओला दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावे,नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी,शेतकऱ्यांना कर्जमाफी व व्याजमाफीबाबत त्वरित निर्णय घ्यावा,खरडून गेलेल्या जमिनी पुन्हा पेरणीयोग्य करण्यासाठी विशेष अनुदान द्यावे.लोकप्रतिनीधी आणी अधिकारी यांनी शेतकर्यांच्या बांधावर जावुन नुसते फोटोसेशन न करता सरसकट मदतनीधी द्यावी.पिडित शेतकर्यांना नुकसानभरपाई न मिळाल्यास तिव्र आंदोलन छेडण्यात येणार अशा मागण्याचे लेखी निवेदन बिगर सातबारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई जगदिशकुमार इंगळे,जिल्हाध्यक्ष राजु इंगोले,शामादादा कोलाम ब्रिगेडचे सुरेश कुंभरे आदी ऊपस्थीत होते.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206