जालना: तेली सेना, संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित एका शानदार सोहळ्यात जाफराबाद तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी आणि समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमात, जाफराबाद तालुक्यातील अनेक होतकरू विद्यार्थ्यांचा त्यांच्या शैक्षणिक कामगिरीबद्दल ‘गुणवंत विद्यार्थी’ म्हणून सत्कार करण्यात आला. यामध्ये वैष्णवी दामोदर साळवे, गायत्री नंदकिशोर साळवे, श्रुती श्रीरंग साळवे, विनायक रवी टोम्पे, ओमकार रवी टोम्पे, पूजा ज्ञानेश्वर दांडयत आणि भाग्यश्री विठ्ठल डोंमळे यांचा समावेश होता. त्यांच्या या यशाचे कौतुक सर्व उपस्थितांनी केले.
समाजाच्या उन्नतीसाठी विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना तेली सेना, संभाजीनगर यांच्या वतीने ‘समाजभूषण पुरस्कार २०२५’ देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये जाफराबाद येथील अॅड. वैष्णवी सूर्यकांत साळवे आणि रवी भिकाजी टोम्पे यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाला गणेश पवार, ह.भ.प. जान्हवी ताई मिसाळ महाराज, बोरसे महाराज, सूर्यकांत साळवे, सुनील साळवे, उषा सूर्यकांत साळवे, रेखा टोम्पे, श्रीरंग साळवे, नंदकिशोर साळवे, गणेश भवर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सत्कार सोहळ्यामुळे तरुण पिढीला प्रेरणा मिळाली असून, समाजातील योगदानाला योग्य सन्मान मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
प्रतिनिधी राहुल गवई,
एनटीव्ही न्यूज मराठी, जाफ्राबाद, जालना.