जालना: जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी गावात महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांना घरगुती वापरासाठी उपयुक्त अशा भांडे संचांचे वाटप करण्यात आले आहे. आमदार संतोष पाटील दानवे यांच्या पुढाकारातून आणि जिल्हा परिषद सदस्य शालीग्राम पाटील म्हस्के यांच्या सहकार्याने हे काम शक्य झाले.

गावाचे सरपंच आणि भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विजय परिहार यांनी हे भांडे संच गावात आणून लाभार्थ्यांना वाटप करण्याची व्यवस्था केली, त्यामुळे कामगारांना त्यांच्या गावातच याचा लाभ घेता आला. बऱ्याच दिवसांपासून या वाटपाची प्रतीक्षा करत असलेल्या कामगारांच्या चेहऱ्यावर आज आनंद स्पष्टपणे दिसत होता.

या प्रसंगी कुंभारझरी गावातील अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. यामध्ये सरपंच विजय परिहार, ग्रामपंचायत सदस्य भगवान चव्हाण, संतोष माळी, शरद चव्हाण, परमेश्वर चिंधोटे, अजय पैठणे, सुनील चव्हाण, शंकर चाचा आणि अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

याशिवाय, तलाठी रवींद्र वैद्य, ग्रामपंचायत अधिकारी सुनील बंगाळे, जेष्ठ पत्रकार गजानन उदावंत, माजी सरपंच मनोहर चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सुरेश गायकवाड, संगणक चालक भागवत चव्हाण, पाणी पुरवठा विभागातील पांडुरंग चव्हाण, आणि शिपाई कौतिक चव्हाण यांचीही विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमादरम्यान ग्रामसभा देखील घेण्यात आली, ज्यामध्ये शेतकरी गटांविषयी गजानन उदावंत यांनी गावकऱ्यांना माहिती दिली.

या महत्त्वपूर्ण उपक्रमामुळे बांधकाम कामगारांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या जीवनात एक आनंदाचा क्षण आला आहे.

प्रतिनिधी राहुल गवई

एनटीव्ही न्यूज मराठी, जाफराबाद, जालना


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *