सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, जाफराबाद जि. जालना, येथील संगणक शास्त्र विभागातील प्राध्यापक व विभाग प्रमुख प्रा. राहुल जनार्दन म्हस्के यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ” संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान” (Computer Science and Information Technology) या विषयात पीएच.डी. ही सर्वोच्च पदवी प्रदान केली आहे.प्रा. राहुल म्हस्के यांनी डॉ. प्राप्ती डी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सायन्स अँड टेक्नॉलॉजी शाखेंतर्गत ” ऑटोमॅटिक फ्रुट कॉलिटी आयडेंटिफिकेशन सिस्टीम फॉर इमिनन्स इन्स्पेक्शन थ्रू कलर इमेज प्रोसेसिंग” हा संशोधन प्रबंध विद्यापीठात सादर केला होता, विद्यापीठाने त्यांच्या या पीएच.डी. प्रबंधास मान्यता देऊन त्यांना ‘संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान ‘ या विषयात पीएचडी पदवीची मान्यता दिली.
प्राध्यापक राहुल म्हस्के हे सिल्लोड शिक्षण संस्थेचे सचिव आहेत तसेच ते नालंदा मॅनेजमेंट अँड कम्प्युटर सायन्स महाविद्यालय ( बीसीए/ बीसीएस महाविद्यालय ) छत्रपती संभाजीनगर येथे प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विविध समित्यावर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सिनेट सदस्य, स्थायी समिती व व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून देखील विद्यापीठ प्राधिकरणावर त्यांनी कार्य केले आहे.
त्यांचे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. U.A.E.( संयुक्त अरब अमिराती) येथील दुबई येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. रावसाहेब कसबे डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तसेच थायलंड येथील बँकॉक मध्ये भरलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद या आंतरराष्ट्रीय परिषदेत देखील त्यांना साहित्य क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे . नेपाळ येथील त्रिभुवनदास विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत देखील त्यांनी आपला शोध निबंध ( Research paper) सादर केला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सादर केलेल्या संशोधनास विद्यापीठाने पीएचडी साठी प्रदान केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सिल्लोड शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. जनार्दनराव म्हस्के, उपाध्यक्ष भारत म्हस्के, श्री मधुकर शिनगारे, डॉ. बी.के. मगरे, डॉ.अमित पुंड, सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.टि. देशमुख ,उप प्राचार्य डॉ.एस. एल.मेढे, डॉ. एस. के.सजे. प्रा. विनोद हिवराळे,डॉ. आर.टि. उबाळे, प्रा. वाल्मीक वाघ, प्रा. हर्षपाल खाडे तसेच सिल्लोड शिक्षण संस्थेअंतर्गत शाळा-महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, नातेवाईक व मित्र आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
