गंगापुर प्रतिनिधी अमोल पारखे.
सेंट मेरी विद्यालय, वाहेगाव येथे तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धामध्ये उल्लेखनीय कामगिरी करून शाळेचे नाव उज्वल केले आहे विविध खेळांमध्ये सहभाग घेत विद्यार्थ्यांनी परिश्रम घेऊन शिस्त आणि चिकाटीच्या बळावर यश संपादन केले

यावेळी विद्यालयाचे मल्ल अमर पाटेकर आणि साई पुंड यांनी तालुका स्तरावर प्रथम क्रमांक तर जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक पटकावत विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला. तसेच कबड्डी स्पर्धेत मुलींच्या व मुलांच्या संघांनी तालुका स्तरावर दुसरा क्रमांक प्राप्त करत विद्यालयाचे नाव उंचावले. सेंट फ्रान्सिस डी-सेल्स शिक्षण संस्थेचे सचिव रे. फा. संजय रूपेकर यांनी कुस्ती पटुंचे ट्रॅक सूट देऊन कौतुक केले व त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक व संघ व्यवस्थापक यांचे आभार मानले. तसेच संस्थेचे संचालक रे. फा. विनोद शेळके, विद्यालयाचे व्यवस्थापक रे.फा. मायकल ऍंथोनी, विद्यालयाचे प्राचार्य श्री. संजय बनसोडे, उपप्राचार्य श्री. संजय निकम, पर्यवेक्षक श्री. अजय थोरात, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. एस. के. जाधव सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षेकतर कर्मचारी यांनी खेळाडूंचे कौतुक केले.