नागपुर
(प्रतिनिधि मंगेश उराड़े एनटीवी न्यूज़ मराठी नागपुर)
काल दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी सावनेरचा कामाक्षी सेलिब्रेशन येथे आम आदमी पार्टीच्या वतीने एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र संघटन मंत्री श्री. भूषण ढाकुलकर, प्रदेश सचिव श्री. सुनील वडसकर, प्रदेश सचिव श्री. शाहीदअली जाफरी, जिल्हाध्यक्ष श्री. वृषभ वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रकाश ढोबळे, जिल्हा महासचिव श्री जमुवंत वारकरी, ज्येष्ठ नेते श्री. संजय तेंभेकर, तालुका अध्यक्ष श्री. पंकज घाटोडे आणि शहराध्यक्ष श्री. गजु चौधरी आदी पदाधिकारी प्रमुख उपस्थित होते.
या बैठकीत येणाऱ्या नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुका सावनेर तालुका अध्यक्ष श्री. पंकज घाटोडे यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टी लढविणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
तसेच सावनेर नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी खालील महिलांची नावे चर्चेत असल्याचेही घोषित करण्यात आले —

• सौ. अनीता रमेश धानवले
• सौ. प्रमिला संजयजी तेंभेकर
• सौ. ज्योती कालिदास बुधोलिया
• सौ. अश्विनी पंकज घाटोडे
पक्षाच्या कार्यकारिणीने नमूद केले की, अजून काही नावे प्राप्त होणार असून, सर्व उमेदवारांची सखोल पडताळणी झाल्यानंतर अंतिम यादी लवकरच जाहीर करण्यात येईल.
पक्षाने सावनेर शहर आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी खालील महत्त्वाचे ९ मुद्दे जाहीर केले.
1) सावनेरकरांसाठी सोलार प्रकल्प — ज्यामुळे वीज बिलाचा भार मोठ्या प्रमाणात कमी होईल.
2) शाळांचे आधुनिकीकरण — नगर परिषदेच्या सर्व शाळांचे इन्फ्रास्ट्रक्चर आणि खेळाच्या मैदानांचे उन्नतीकरण करून दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यात येईल.
3) पाण्याच्या टाक्यांचे नुतनीकरण — जुन्या टाक्यांचे पुनर्बांधणी व आधुनिक वॉटर फिल्टर
प्लांटची स्थापना.
4) स्पर्धा परीक्षार्थींसाठी आधुनिक वाचनालय — संगणक आणि नवीन तंत्रज्ञानासह, तसेच
वयोवृद्ध नागरिकांसाठी कादंबरी वाचनासाठी सुविधा.
5) वृद्ध नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र — 60+ वयोगटासाठी आराम व त्यांच्या कौशल्यांचा उपयोग होईल असे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येईल.
6) युवकांसाठी रोजगार शिबिरे — तसेच बचत गटांच्या उत्पादनांची विक्री होण्यासाठी स्थानिक मॉल स्थापन केला जाईल.
7) नगर परिषदेच्या माध्यमातून नवे कॉम्प्लेक्स व रोजगार निर्मिती उपक्रम सुरू केले जातील.
8) शहरातील रस्ते, नाले, बागा, खेळाचे मैदाने यांचे सौंदर्यीकरण व नुतनीकरण केले जाईल.
9) सावनेरचा सर्वांगीण विकास हा आम आदमी पार्टीचा संकल्प — नागरिकांच्या सहभागातून प्रामाणिक आणि पारदर्शक शासन.
या पत्रकार परिषदेत पक्ष पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, आम आदमी पार्टी सावनेरचा विकास आणि पारदर्शक स्थानिक प्रशासन यासाठी कटिबद्ध आहे