घटना. खापा (नरसाला) अरविन्द सेंभेकर (उपसरपंच) हे रुग्णालय भर्ती आहे
सावनेर तालुक्यातील केळवद पोलीस ठाण्याअंतर्गत ग्राम खापा (नरसाळा) येथील उपसरपंच यानी अवैद्य दारू विक्रीचा विरोध केल्याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.
ही घटना सोमवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार उपसरपंच यांच्या विरोधाने चिडलेल्या दारू विक्रेत्यांनी बोलता बोलता उपसरपंचांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केले.आरोपीचे नाव अरविंद देवानंद बागडे (२८) व देवानंद बागडे (६४) व इतर खापा(न) रहिवासी असे सांगण्यात आले आहे.
उपसरपंच अरविंद शेंबेकर यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केलेली होती.अरविंद शेम्बेकर हे काही मजुरांना घेऊन मंजूर असलेल्या सरकारी रुग्णालय बांधकामाचे काम करत होते.तक्रारदारांच्या म्हणण्या नुसार आरोपी देवानंद बागडे यांनी दारूच्या नशेत उपसरपंचांना शिवीगाळ केली. याची माहिती मिळताच उपसरपंचांनी केळवद पोलिसांना फोन करून माहिती दिली.परंतु पोलिस पोहोचण्या पूर्वीच आरोपी बागडे यांनी लोखंडी रॉडने उपसरपंचांच्या डोक्यावर वार केला, ज्यामुळे ते घटनास्थळीच बेशुद्ध पडले.गंभीर अवस्थेत त्यांना सावनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.जखमीच्या भावाने टीकाराम शेंबेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवानंद बागडे, अरविंद बागडे आणि नलू बागडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केळवद पोलिस ठाण्याचे ठाणेदार श्री आशीषसिंह ठाकूर यांनी सावनेर येथील खासगी रुग्णालयात जाऊन जखमीचा जबाब नोंदविला आहे.
पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.खापा(नरसाळा) परिसरातिल नागरीक प्रल्हाद डोंगरे, संदीप मेश्राम, रवींद्र गेडाम, राजेश मेश्राम, सतीश सोनवणे, संदीप गोळे, केळवद चौकीचे सुशांत मेश्राम, राहुल इंगळे तसेच ग्रामपंचायतीचे इतर सदस्य यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमी उपसरपंच अरविंद सेंभेकर यांची विचारपूस केली.पुढील तपास केलवद पोलिस करित आहे