• शेतकऱ्यांच्या विकासाचा नवा टप्पा; सर्वाधिक दर आणि वेळेवर हप्ता देण्याची परंपरा कायम

धाराशिव, प्रतिनिधी सचिन बिद्री

उमरगा, धाराशिव: उमरगा तालुक्यातील भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखान्याच्या आठव्या गाळप हंगामाचा शुभारंभ दि. २७ ऑक्टोबररोजी समुद्राळ येथील कारखान्याच्या (क्युनर्जी इंडस्ट्रीज लि.) प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. कारखान्याच्या उभारणीसाठी मोठा संघर्ष करावा लागला असला तरी, गेल्या आठ वर्षांत या कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात ‘गोडवा’ निर्माण केला आहे.

सर्वाधिक दरामुळे ठरला ‘वरदान’

उद्घाटनपर भाषणात प्रा. सुरेश बिराजदार यांनी मत व्यक्त केले की, भाऊसाहेब बिराजदार कारखान्याने परिसरातील व जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये ऊसाला सर्वाधिक दर देण्याची आणि वेळेवर हप्ता देण्याची परंपरा जपली आहे. याच धर्तीवर इतर कारखान्यांनाही भाव व हप्ता द्यावा लागत असल्याने, भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरला आहे.

कार्यक्रमाची सुरुवात माणिकराव बिराजदार यांच्या हस्ते मोळी व गव्हाण पूजनाने झाली, तर विविध गावांतील शेतकऱ्यांच्या हस्ते काटा पूजन करण्यात आले.

प्रमुख उपस्थितांचा सहभाग

यावेळी कारखान्याचे संचालक सुनिल माने, साहेबराव पाटील, गोविंदराव साळुंके, युवराज पाटील, इमाम पटेल, आर.डी माने यांच्यासह अशोक कारभारी, सुनील साळुंखे, शमशोद्दीन जमादार, रमेश बिराजदार, सुभाष गायकवाड, मारुती पाटील, भीमा स्वामी, अमर बिराजदार, रामकृष्ण बिराजदार, प्रकाश सुभेदार, कवलजीत बिराजदार, राऊ भोसले, गोजरबाई बनसोडे, योगीराज स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा

प्रा. सुरेश बिराजदार यांनी यावेळी महत्त्वपूर्ण आवाहन व घोषणा केल्या. त्यांनी सांगितले की,

  • ऊस उत्पादक व सभासदांचा ऊस संपेपर्यंत कारखान्याचा गळीत हंगाम सुरू राहील.
  • शेतकऱ्यांना योग्य दरासह वेळेत हप्ता दिला जाईल.
  • कारखान्यात इथेनॉल निर्मिती, विद्युत निर्मिती यासह अद्ययावत यंत्रणा उभारण्यात आली आहे.
  • ऊस वाहतूक व तोडणीसाठी हार्वेस्टर यंत्रांसह मोठ्या प्रमाणात यंत्रणा करारबद्ध करण्यात आली आहे.
  • ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी व सभासदांनी कारखान्याला जास्तीत जास्त व चांगल्या प्रतीचा ऊस मोठ्या प्रमाणात पुरवठा करावा, असे आवाहन त्यांनी केले.

अधिकारी व सभासदांची उपस्थिती

यावेळी गहिनीनाथ कोकाटे, संजय जाधव, किसन जाधव, आयुब इनामदार, सत्यनारायण जाधव, प्रदीप पाटील, माधवराव पाटील, प्रताप महाराज, प्रदीप गावकरी, विष्णू भगत, जालिंदर कोकणे, बाबा शेख, प्रकाश भगत, जीवन जाधव, मुरली पाटील, रणजीत बिराजदार, फैय्याज पठाण, कृष्णा मदनसुरे, अमोल खोंडे, किशोर औरादे, ज्योतीराम औरादे, बालाजी साळुंखे, विजय पाटील, राजेंद्र पाटील, किशोर जाधव, चंद्रहार्ष बनसोडे, काशिनाथ गायकवाड, पवन पाटील आदींसह क्युनर्जी इंडस्ट्रीजचे जनरल मॅनेजर पाटील बि. जे., चीफ इंजिनिअर राहुल मेरगळ, मुख्य शेती अधिकारी शेंडगे रामचंद्र, त्रिगुळे सुरेश, बिराजदार ज्ञानेश्वर, चीफ केमिस्ट पांढरे सुरज, डिस्टलरी मॅनेजर कोळगे ज्ञानेश्वर यांच्यासह परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी सचिन बिद्री,

एनटीव्ही न्यूज मराठी, उमरगा, धाराशीव.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *