(प्रतिनिधी मंगेश उराडे, नागपूर)

कळमेश्वर, दि. ३० ऑक्टोबर २०२५ – कळमेश्वर आणि मोहपा नगरपरिषद क्षेत्रातील रहिवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे! आज, आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांच्या शुभहस्ते या दोन्ही नगरपरिषद क्षेत्रांतील एकूण ₹५ कोटी ६५ लाख निधीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले.

हे भूमिपूजन सोहळे कळमेश्वर आणि मोहपा येथे आयोजित करण्यात आले होते. या महत्त्वाकांक्षी विकासकामांमध्ये कळमेश्वर नगरपरिषद क्षेत्रासाठी ₹३ कोटी ५६ लाख आणि मोहपा नगरपरिषद क्षेत्रासाठी ₹२ कोटी ९ लाख इतका निधी खर्च करण्यात येणार आहे.

नागरिकांचे जीवनमान उंचावणाऱ्या कामांचा समावेश

या विकासकामांमध्ये प्रामुख्याने रस्ते सुधारणा, पाणीपुरवठा योजना, स्वच्छता प्रकल्प, सार्वजनिक सुविधा आणि शहरी सौंदर्यीकरण यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. या विकासकामांमुळे या दोन्ही शहरातील नागरिकांचे जीवनमान निश्चितच उंचावण्यास मदत मिळणार आहे.

विक्रम वेळेत विकासकामांचा तडाखा

यावेळी बोलताना, गेल्या केवळ १० महिन्यांत आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्रात विकासकामांचा अक्षरशः तडाखा लावला आहे, असे नमूद करण्यात आले. त्यांच्या प्रयत्नातून रोजगारनिर्मिती, उद्योगवृद्धी आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, संपूर्ण विधानसभा क्षेत्रात सर्वांगीण विकासाची नवी दिशा मिळत आहे. जनतेचा विश्वास आणि लोकप्रतिनिधींचे अथक प्रयत्न याचे हे द्योतक आहे.

या भूमिपूजन सोहळ्यासाठी डॉ. राजीव पोतदार, श्री. मनोहर कुंभारे, श्री. प्रकाश वरुळकर, श्री. प्रमोद कोल्हे, श्री. महादेव इखार, श्री. मनोज बंड, श्री. धनराज देवके, श्री. प्रमोद हत्ती, श्री. प्रतीक कोल्हे, प्रगती मंडळ, सौ. मनीषा लंगडे, विद्याताई शेवाळे, सौ. मीनाताई इखार, श्री. शैलेंद्र अस्वले, सौ. रुपाली चुनारकर, सौ. जयश्री पवार, श्री. बापूसाहेब हळदे, श्री. इमेश्वर यावलकर, श्री. नानाजी काथवटे आणि प्रशांत मडावी यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनिधी मंगेश उराडे,

एनटीव्ही न्यूज मराठी, नागपूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *