• देवेन्द्र फडणवीस सरकारने कर्जमाफीची तारीख जाहीर केल्याने विरोधक तोंडघशी पडले.

NAGPUR | देवेंद्र फडणवीस सरकारने आताच कर्जमाफीची तारीख जाहीर केली आहे, त्याकरिता उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. यावर सावनेर-कळमेश्वर विधान क्षेत्राचे आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी प्रतिक्रियेत म्हटले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफीची तारीख जाहीर केली असून ही संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आमच्या भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनामा मध्ये म्हटल्या प्रमाणे 30 जून 2026 पर्यंत देवेन्द्र फडणवीस सरकार कर्जमाफी करणार आहे. यावर्षी अतिवृष्टी, पुरस्थिती बघता आतापर्यंतचे सर्वात मोठे 32000 करोड चे नुकसानभरपाई पॅकेज सरकारने दिले आहे. ते लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील.
कर्जमाफीसाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत झाली असून कर्जमाफी शिफारस दिल्यानंतर एप्रिल – जून पर्यंत कर्जमाफी घेऊन शेतकरी सुखावलेला दिसेल.
याआधीही मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये देवेन्द्र फडणवीस यांनी कर्जमाफी केलेली आपण बघितली. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर संकट आले तेव्हा देवेन्द्र फडणवीस हे मदतीला धावून आले, हे आपण बघितले आहे.
सातत्याने शेतकरी कर्जाच्या खाईमध्ये लोटला जातो या करिता सरकार उपाययोजना करत आहे. किसान सन्मान निधी, राज्य सरकार कडून एकूण वर्षाचे 12000 रुपये, लाडल्या बहिणीला 1500 रुपये, प्रत्येक शेतकऱ्यांना शेतातील विजबिल माफ केले आहे , जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आला तेव्हा भरीव मदत सरकार करत आहे, आता जाहीर झालेली कर्जमाफी हेच दर्शविते की भारतीय जनता पार्टीचे सरकार बळीराजा, शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील पीक सरकारी केंद्रामध्ये हमीभावानेच विकावे.
या वेळी विरोधकांनी सरकारला कचाट्यात टाकण्याचा प्रयत्न केला, तो फोल फडला. खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी 30 जूनपर्यंत उच्चस्तरीय शिफारसीनुसार कर्जमाफी करू असे जाहीर केले. यामुळे विरोधक तोंडघाशी पडले आहे, असे आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी म्हटले.

मंगेश उराडे, नागपुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *