अ. नगर:- अहिल्यानगर येथील कौटुंबिक न्यायालय येथे आज वकील संरक्षण कायदा लागू व्हावा म्हणून सर्व वकील बंधू भगिनींनी लालफिती लावून न्यायालयीन कामकाजास सुरुवात केली. वकील संरक्षण कायदा लागू व्हावा म्हणून महाराष्ट्रातील संपूर्ण वकिलांनी अनेक वेळा अनेक प्रकारे शासनदरबारी निवेदन देऊन पाठपुरावा करुनही ऊपयोग झाला नाही.

शासनाला जाग यावी म्हणून बार काउन्सिलऑफ महाराष्ट्र यांचे निर्देशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रात वकीलांनी लालफिती लावून कामकाजास सुरुवात केली. यावेळी कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड लक्ष्मण कचरे, उपाध्यक्ष ॲड सुरेश लगड, संस्थापक अध्यक्ष ॲड. शिवाजी कराळे, कार्याध्यक्ष ॲड. शिवाजी सांगळे, सचिव ॲड राजेश कातोरे, ऄड. पोपट म्हसके , कल्याण पागर, ॲड मनोज जायभाये , ॲड रघुनाथ बनकर, वैभव कदम, ॲड योगेश दहातोंडे ॲड सुजाता बोडखे, ॲड भाग्यश्री गोरे, बबनराव झगडे, ॲड विराज लगड, ॲड युवराज पोटे, ॲड. विनायक सांगळे, ॲड. सुधीर भागवत, ॲड दिपक धिवर, प्रभाकर शहाणे, ॲड लता गांधी, ॲड संतोष कांडेकर, कौस्तुभ कुलकर्णी ॲड आनंद सुर्यवंशी,आदी मान्यवर वकील उपस्थित होते.

यावेळी ॲड शिवाजी कराळे यांनी सांगितले की जर यापुढे वकीलांवर हल्ला झाला तर त्यास जशास तसे उत्तर दिले जाईल. अध्यक्ष ॲड लक्ष्मण कचरे यांनी सांगितले की शासनाने क्षणाचाही विलंब न करता, वकील संरक्षण कायदा मंजूर करावा.