संरक्षणासाठी ‘महसूल’ प्रशासन उदासीन ( मनोहर तावरे )

मोरगाव : दि. ७ नोव्हेंबर २०२५


मोरगाव : बारामतीत तालुक्यात ऐतिहासिक परगाना अशी ओळख असलेल्या ‘सुपा’ येथे भुईकोट किल्ला सध्या नामशेष झालाय. येथे किल्ल्याची पुरातन जागा आणि वास्तू संरक्षण करण्यासाठी प्रशासनच उदासीन आहे . या जागेवर बोगस नोंदी लावून काही जणांनी अतिक्रमणाचा सपाटा लावला आहे. याची दखल कोण ? घेणार असा सवाल उपस्थित होतो. ऐतिहासिक काळात स्वराज्य संकल्पक शहाजीराजांचा परगाना म्हणून 'सुपा' या परिसराची ओळख आहे. या काळाची साक्ष देणाऱ्या आजही पुरातन वास्तू या गावात पाहायला मिळतात. महाराष्ट्र शासन पुरातत्व आणि महसूल विभाग मात्र ; याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. या किल्ला असलेल्या जागेतच मनमानी अतिक्रमण करण्यात आले आहे. सुपे गावठाणात सिटी सर्वे नंबर ७५५ नुसार या किल्ल्याची संरक्षित जागा नोंद आहे. येथे राहणाऱ्या लगतच्या जमीन जागा मालक संकुचित वृत्तीने अतिक्रमण करीत असल्याने शिवप्रेमी संतप्त आहेत. नगर भूमापन विभागात गेल्या अनेक वर्षापूर्वी या जागेची नोंदच चुकीच्या पद्धतीने नोंद करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्व विभाग तसेच तहसीलदार यांना याबाबत ग्रामपंचायतच्या वतीने पाठपुरावा सुरू आहे. अशी माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने बोलताना दिली. येथील ही प्राचीन वस्तू संरक्षणा बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही यापूर्वी पत्र देण्यात आले आहे. ऐतिहासिक काळात स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांच्याकडे असलेला हा परगाना म्हणून या गावाचा समावेश होतो. त्यानंतरच्या कालखंडात छत्रपती शिवाजी (महाराज) यांच्या कडे असलेल्या जहागिरीत पुणे, चाकण, इंदापूर,सुपे चा उल्लेख आहे. या दृष्टीने सुपा हे महत्त्वपूर्ण मानले जाते. भुईकोट किल्ला जागा संरक्षणासाठी शासनाने मदत करावी - सुनील राजे भोसले सुपा येथील ऐतिहासिक गड किल्ला व जागा संरक्षणासाठी शासनाने मदत करणे अपेक्षित आहे. येणाऱ्या पुढच्या पिढीला आपण काय ? इतिहास सांगणार असा प्रश्न या भागात निर्माण होईल. सातारा येथील खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या माध्यमातून याबाबत राज्या व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सुपा परगाण्याचे प्रमुख सुनील राजे भोसले यांनी बोलताना सांगितले.

शनिवारी सुपा बंद चे आवाहन

भुईकोट किल्ल्याच्या जागेत अतिक्रमण निषेधऐतिहासिक परगाणा सुपा येथे भुईकोट किल्ल्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या जागेत बोगस कागदपत्राच्या आधारे अतिक्रमण झाल्याने याची संपूर्ण चौकशी व्हावी या मागणीसाठी सुपा ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी दि. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी गाव बंदचे आवाहन करण्यात आले.