जाफ्राबाद, दि. १७ नोव्हेंबर
जालना – छत्रपती संभाजीनगर येथून प्रकाशित होणाऱ्या लोकप्रिय दैनिक ‘अजिंक्य केसरी’ च्या सहसंपादकपदी शैक्षणिक क्षेत्रातील नामवंत, गुणवंत व्यक्तीमत्त्व प्रा. डॉ. राहुलभाऊ म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘दै. अजिंक्य केसरी’चे मुख्य संपादक श्री. समाधान तुकाराम वाणी यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे.
निर्भीड पत्रकारितेची अपेक्षा
प्रा. डॉ. राहुलभाऊ म्हस्के यांची शैक्षणिक क्षेत्रातील कारकीर्द उल्लेखनीय आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे, पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांच्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी, गोरगरीब व होतकरू तरुण पिढीला प्रेरणा देण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सर्वच क्षेत्रांतून व्यक्त होत आहे. प्रा. डॉ. राहुलभाऊ म्हस्के यांना महाविद्यालयीन काळापासूनच पत्रकारितेची आवड होती. त्यांनी ‘दै. अजिंक्य केसरी’चे सहसंपादक म्हणून कार्यभार स्वीकारल्यामुळे निश्चितच निर्भीड, निःपक्षपाती पत्रकारिता आणि रोखठोक बातम्या प्रकाशित होतील, यात शंका नाही.
सर्व स्तरांतून होतंयं कौतुक
डॉ. म्हस्के यांच्या या कार्याचे कौतुक सर्व स्तरांतून होत आहे. सिल्लोड शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. दादासाहेब म्हस्के, दै. अजिंक्य केसरीचे मुख्य संपादक श्री. समाधान तुकाराम वाणी, सिद्धार्थ महाविद्यालय, जाफराबाद येथील सर्व कर्मचारी बंधू-भगिनी तसेच जाफराबाद शहरातील समस्त मित्र परिवार या सर्वांनी प्रा. डॉ. राहुलभाऊ म्हस्के यांना त्यांच्या या नवीन वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रतिनिधी राहुल गवई,
एनटीव्ही न्यूज मराठी, जाफ्राबाद, जालना.
