• अर्ज माघारीनंतर प्रमुख पक्ष आणि अपक्षांमध्ये मोठी चुरस; आठरंगी लढत अटळ..!

जामखेड प्रतिनिधी, (दि. २२ नोव्हेंबर)

अहिल्यानगर: जामखेड नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या १३ उमेदवारांपैकी ४ जणांनी माघार घेतल्यामुळे आता ९ उमेदवार रिंगणात उरले आहेत. तर, नगरसेवकपदासाठी वैध ठरलेल्या १२० उमेदवारांपैकी १८ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता १०२ नगरसेवकपदाचे उमेदवार निवडणुकीस सामोरे जात आहेत.

नगराध्यक्षपदासाठी ९ उमेदवारांत चुरस

नगराध्यक्षपदासाठी ९ उमेदवार रिंगणात असल्याने जामखेडमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. यामध्ये प्रामुख्याने भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या प्रमुख पक्षांमध्ये खरी लढत रंगणार आहे.

नगराध्यक्षपदासाठी रिंगणातील प्रमुख उमेदवार:

पक्ष/संघटनाउमेदवाराचे नाव
भाजपप्रांजलताई अमित चिंतामणी
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार पक्ष)संध्या शहाजी राळेभात
शिवसेना (शिंदे गट)पायलताई आकाश बाफना
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)सुवर्णा महेश निमोणकर
राष्ट्रीय काँग्रेसजैनब वाहेद कुरैशी
समाजवादी पक्षपरविन सिराजुद्दीन शेख
अपक्षप्रीती विकास राळेभात
अपक्षनसीम सलीमभाई बागवान
अपक्षरेश्मा युन्नुस शेख

यांनी घेतली माघार

अर्ज मागे घेतलेल्या नगराध्यक्ष उमेदवारांमध्ये प्रहार जनशक्ती संघटनेच्या शेख शहनाज नय्युम, आम आदमी पार्टीच्या शेख रेहममुन्निसा कमाल, राळेभात प्रियांका दिनेश (अपक्ष) आणि माने वर्षा कैलास (अपक्ष) यांचा समावेश आहे.

निवडणूक जाहीर होताच इच्छुकांची वाढलेली गर्दी आणि राजकीय वातावरण आता अंतिम लढतीसाठी पूर्णपणे तापले आहे. नगराध्यक्षपदासाठी ९ आणि नगरसेवकपदासाठी १०२ उमेदवार रिंगणात असल्याने जामखेड नगरपरिषद निवडणुकीचा निकाल अत्यंत रंजक ठरणार आहे.


प्रतिनिधी नंदु परदेशी,

एनटीव्ही न्यूज मराठी, अहिल्यानगर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *