गंगापूर प्रतिनिधी – अमोल पारखे
गंगापूर तालुक्यातील वाहेगाव येथे दि,६ डिसेंबर रोजी भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्मारक स्थळे तसेच ग्रामपंचायत कार्यालयात बाबासाहेबांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली.
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेलाही ग्रामपंचायतीच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि त्यांच्या समाजसुधारक कार्याचेही स्मरण करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य दत्तु मनाळ, राजेश्वर हिवाळे, रवींद्र भडके, एकनाथ पारखे, दयानंद पारखे, राकेश पारखे, संजय पारखे, अभिजीत पारखे, भास्कर पारखे, छोटू पारखे, राम पारखे, कुंदन पारखे, अमोल पारखे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी पुष्पहार अर्पण करून संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर व समाजसुधारक महात्मा फुले यांच्या कार्याचा आदरपूर्वक उल्लेख केला.
गावातील नागरिक, महिला वर्ग, युवक मंडळे आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विनम्र श्रद्धांजली वाहिली. संविधानातील मूल्ये, समानता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचे महत्त्व यावेळी उपस्थितांना सांगण्यात आले.
कार्यक्रमाची सांगता ‘जय भीम’च्या घोषणांनी आणि संविधान मूल्यांचे पालन करण्याचा निर्धार व्यक्त करून करण्यात आली.
