जळगाव

ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन च्या राष्ट्रीय कार्यकारणीची सभा जळगाव येथील कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ह्या निसर्गाने बहरलेल्या नयनरम्य पर्यावरणीय आनंदाचा सुखद अनुभव देणा-या व जवळपास ६५० एकर मध्ये स्थापित विद्यापीठाच्या सुसज्ज स्कूल ऑफ सोशल सायन्सेस् सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
सदर सभेला भारताच्या ओरिसा, तेलंगणा, गोवा, मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्यातील AIAEF चे राज्य अध्यक्ष, राज्य महासचिव, राज्य कार्याध्यक्ष उपस्थित होते. तसेच सभेला महाराष्ट्र राज्य पदाधिकारी व राज्यातील जिल्हाध्यक्ष, सचिव, कार्याध्यक्ष, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विषेश:ता चंद्रपूर, वर्धा, अमरावती, मुंबई, गडचिरोली, नाशिक, नागपूर, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील फेडरेशनचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. सभेचे अध्यक्ष स्थान केंद्रीय अध्यक्ष प्रा. मधुकर उईके यांनी भूषविले होते. तर या सभेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून दिनकर पावरा, अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक यांची उपस्थिती होती.
यावेळी मंचावर देविदास उर्फ देवा पवार (केंद्रीय सहकार्याध्यक्ष), ईश्वर धुर्वे (केंद्रीय कोषाध्यक्ष), प्राचार्य डाॅ. चेतनकुमार मसराम (केंद्रीय संघटक), माधवराव गावड (केंद्रीय उपाध्यक्ष तथा नागपूर विभागीय अध्यक्ष ), प्रा. शांताराम उईके (केंद्रीय संघटक),
श्रीकांत गांवकर (केंद्रीय संघटक), श्रीकांत मालवी (केंद्रीय सदस्य), कोटे रवी तेलंगणा, टिकेश्वर भोई ओरिसा), उपासो गावकर गोवा, दिपक करमळकर SC/ST आयोग गोवा, चेतन पटेल (राज्य समन्वयक मध्यप्रदेश), यशवंत मलये महाराष्ट्र, गजमल पवार, विठ्ठलराव मरपे, किसन तळपाडे, प्राचार्य डाॅ. नाना गायकवाड, प्रा.डाॅ. गजानन सोयाम, सुनिल तलांडे, मनोहरराव उईके, संजय पारधी हे उपस्थित होते.
सभेत विविध राज्यांतील राज्य अध्यक्ष व राज्य महासचिव यांनी आप-आपला राज्य अहवाल वाचन करून राज्यातील विविध विषयांची मांडणी केली.
अध्यक्षीय मनोगत प्रा. मधुकर उईके यांनी आपल्या मार्गदर्शनात आज पावेतो फेडरेशनव्दारा केलेल्या कार्याचा वृत्तांत उपस्थितांपुढे मांडला शिवाय राज्य पदाधिकाऱ्यांनी आप-आपल्या राज्यात फेडरेशनव्दारे सामाजिक जबाबदारीने कर्मचा-यांच्या प्रश्नांबाबत गंभीर राहून कार्य करण्याचे आवाहन केले. यशवंत मलये यांनी नागपूर येथील केंद्रीय AIAEF फेडरेशन भवन प्रस्तावित इमारत निधी त्वरित जमा करण्याचे आव्हान केले. मंचावरील प्रत्येक वक्त्यांनी नियोजनात्मक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय संघटक प्रा. शांताराम उईके यांनी केले. सभेत देविदास उर्फ देवा पवार यांनी केंद्रीय कार्यकारणीच्या वतीने केंद्र सरकार व राज्य सरकारकडे पाठविण्यात येणा-या १७ ठरावांचे वाचन केले व उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांनी सर्व ठरावाला सर्वानुमते मंजूरी दिली.
गजमल पवार यांच्या नेतृत्वात मोहन पावरा, रोहिदास गायकवाड, आसाराम बागुल, सुनिल सुळे, सुभाष कुवर तसेच वसंत वळवी, प्रकाश वसावे, प्रदिप बारेला, प्रा. के.के. वळवी, प्रा.डाॅ. जयेश पाडवी, डाॅ. रमजान तडवी, विजय चव्हाण, मगन वळवी, प्रा. गौरी वळवी, सौ. सुनिता अहिरे, प्रा.डाॅ. अरुण वळवी, प्रा.डाॅ. राजू आमले, प्रा. संजय पाडवी, प्रा. विनेश पावरा, अब्दुल तडवी, अर्जुन महाले, खुमानसिंग वळवी, अमित गावित, प्रकाश चौरे, अभिमन्यू पवार, गेंदाराम बारेला, राकेश बारेला यांनी अथक परिश्रमाने कार्यक्रमाचे आयोजन-नियोजन केले.
कार्यक्रमात शेवटी उपस्थितांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आले. सुत्रसंचलन प्रा.डाॅ. योगेश महाले यांनी केले, प्रा.डाॅ. शाम सोनवणे यांनी आभार प्रदर्शन करुन बैठकीची सांगता केली.

प्रतिनिधी जब्बार तडवी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *