अहमदनगर बार असोसिएशन अहमदनगर निवडणूक २०२५-२०२६ ची निवडणूक दिनांक २३ डिसेंबर रोजी पार पाडण्यात आली होती नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत अक्षय उर्फ धनंजय आप्पासाहेब म्हस्के यांची कार्यकारी सदस्य पदावर निवड झाली आहे. या निवडणुकीत धनंजय आप्पासाहेब म्हस्के यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. कायदा क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव, प्रामाणिक कामकाज आणि वकिलांच्या प्रश्नांसाठी घेतलेली ठाम भूमिका यामुळेच त्यांना हा विश्वास मिळाल्याचं बोललं जात आहे. निवडीनंतर बोलताना धनंजय आप्पासाहेब म्हस्के यांनी सर्व मतदारांचे आभार मानत, बार असोसिएशनच्या हितासाठी आणि न्यायव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या निवडीमुळे वकिलांमध्ये आनंदाचं वातावरण असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
