जामखेडला रिंगरोड अन् काँक्रिट रस्ते होणार
जामखेड शहराला रिंगरोड आणि शहरांतर्गत काँक्रिटरस्ता प्रकल्प राबवणार असल्याचा पुर्नरूच्चार विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केला. तसेच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक जिंकायचीच असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
जामखेड नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रांजल अमित चिंतामणी व निवडून आलेल्या भाजप नगरसेवकांचा सत्कार सभारं जामखेड शहरातील विठाई मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी सभापती प्रा. शिंदे बोलत होते. ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, दत्तात्रय वारे,जामखेड भाजपच्या नगराध्यक्षा सौ प्रांजल चिंतामणी व नगरसेवकांचा सत्कार करताना सभापती प्रा. राम शिंदे व ज्येष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात
प्रवीण घुले, ॲड. कैलास शेवाळे, अजय काशीद, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, पवन राळेभात, ज्योतीक्रांतीचे चेअरमन आजिनाथ हजारे, प्रशांत शिंदे यांच्यासह भाजपचे
पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सभापती शिंदे म्हणाले, जामखेड नगरपरिषदेच्या निवडणुकीत आम्ही जो वचननामा दिला आहे.
त्यातील सर्व कामे आम्ही पूर्ण करणार आहोत. पुढील पाच वर्षाचे व्हिजन आम्ही लोकांसमोर मांडले असून, पक्षाचे संघटन आणि विचार यामुळे नगरपरिषदेत विजय मिळवता आल्याचे त्यांनी सांगितले.
नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी म्हणाल्या, जनतेने माझ्यावर टाकलेला विश्वासाला तडा जावू देणार नाही. पक्षाची विचारधारा आणि जनतेचे हित मी जपणार आहे. सामान्य माणसाचा आवाज शासन दरबारी पोहोचवणे माझी जबाबदारी राहिल. सर्व नगरसेवकांना बरोबर घेत काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नंदु परदेशी
जिल्हा प्रतिनिधी अहिल्या नगर
मो नं 9765886124
