जामखेड येथील कोठारी प्रतिष्ठान व जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन व समर्थ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जयभवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्था पिंपळगाव जलाल येवला जिल्हा नाशिक ते अहिल्यानगर जामखेड येरमाळा तुळजापूर अक्कलकोट ते गाणगापूर येथुन आलेल्या सायकल याञेचे स्वागत तसेच अहिल्यानगर येथील आनंदधाम फौंडेशन या संस्थेस अण्णदाता पुरस्कार व डॉ मिसबाह शेख यांनी जिल्हात पहिल्या ग्लुकोमा सर्जन ही पदवी मिळाली या बद्दल गौरव नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी व नगरसेवक व पञकारांचा सत्कार करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक आनंद कांतीलाल कोठारी आयोजक संजय कोठारी न्यायाधीश विक्रम आव्हाड, न्यायाधीश सौ.पूजा आव्हाड नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी, भाजपाचे युवा नेते अमित चिंतामणी , ,जय भवानी सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोरकडे, नेवासा नगर पंचायत चे कर निर्धार व प्रशासकीय अधिकारी सागर झावरे आनंदधाम फौंडेशन चे अध्यक्ष अभय लुणिया समर्थ हॉस्पिटलचे संचालक डॉ. भरत दारकुंडे, अहिल्यानगर येथील डॉ विठ्ठलराव विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालयचे प्राध्यापक व विभाग प्रमुख शरीर रचना शास्त्र विभाग डॉ. डॉक्टर सुधीर पवार , माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला आहे
यावेळी बोलताना या कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक आनंद कोठारी सायकल यात्रेत सपत्नीक सहभागी झालेले निवृत्त न्यायाधिष विक्रम राठोड संस्थेचे अध्यक्ष विजय भोरकडे डॉ सुधीर पवार मधुकर राळेभात नगराध्यक्षा प्राजलताई चिंतामणी यांच्या सह मान्यवरांनी संजय कोठारी यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या कार्य आठवणीला उजाळा दिला याच कार्यक्रमा दरम्यान आनंद धाम फाऊंडेशन अहिल्या नगर संस्थेच्या अध्यक्षांना संजय कोठारी यांच्या वतीने अन्नदाता भुषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले तर या कार्यक्रमावेळी साखर सम्राट अशोक चोरडिया, धनंजय भोसले, विजय कोठारी ,कांतीलाल कोठारी , राहुल राकेचा, मनोज दुगड, निलेश दुधडिया, मनोज कुलथे, संजय टेकाळे ,सुभाष भंडारी,सुमित चाणोदिया, प्रशांत बोरा, सुनील चोरडिया ,विनोद बेदमुथा ,संदीप भंडारी, विनोद बोरा, कृष्णा चिंतामणी राजेंद्र कुलथे, प्रमोद बोगावत संतोष लोढा, सचिन देशमुख, एनसीसी ऑफिसर अनिल देडे, संकेत कोठारी आदी उपस्थित होते
नंदु परदेशी
अहिल्या नगर जिल्हा प्रतिनिधी
मो नं 9765886124
