अन्यथा रस्ता रोको आंदोलन


वाशिम:-मंगरूळपीर तालुक्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग गेलेले आहेत. त्या महामार्गावरील रस्ता दुभाजकावर पथदिवे बसविलेले आहेत शहरांतील मानोरा रोड ते अकोला रोडवरील खरेदी विक्री केद्रापर्यंत तसेच शेलगाव फाटा ते कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंत रस्ता दुभाजका वरील पथदिवे सुरू होऊन जवळपास एक वर्ष होत आले परंतू कृषी उत्पन्न बाजार समिती पासून पंचशील नगर पर्यंत असलेले पथदिवे अद्याप पर्यंत नाहरकत दाखला अभावी बंद आहेत त्यामुळे पंचशील नगर पूर्णतः अंधारलेले आहे त्यामुळे येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शासनाने शक्य तितक्या लवकर ग्रा. पंचायत प्रशासनाला आदेशित करुन तत्काळ जनतेच्या सेवेत पथदिवे सुरू करुन द्यावे व पंचशील नगर ला अंधारातून प्रकाशाकडे न्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला अश्या मांगणीचे निवेदन वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आले

यावेळी तालुका अध्यक्ष गजानन इंगोले, शहर अध्यक्ष सौरभ सपकाळ, जि. उपाध्यक्ष समाधान भगत, जनार्दन बेलखडे, गोपाल मनवर, विनोद भगत, लखन वानखेडे, विनायक कांबळे, जगदीश दांदे, देविदास इंगोले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *