फुलचंद भगत
वाशिम:-मंगरूळपीर तालुक्यातील पेडगाव येथील रहिवासी व माजी पंचायत समिती सभापती बंडूभाऊ वैद्य यांच्या समय सुचकतेमुळे महाराष्ट्र ट्रॅव्हल्स मधील 50 प्रवाशांचे प्राण वाचले आहे.


सविस्तर वृत्त असे की,नागपूर ते संभाजीनगर द्रुतगती मार्गावर नागपूरहून निघालेली महाराष्ट्र ट्रॅव्हल्स आज दि.7 मे रोजी रात्री 10 वाजता दरम्यान मंगरूळपीर तालुक्यातील पेडगाव गावामध्ये आल्यावर या ट्रॅव्हलच्या मागील टायर ने पेट घेतलेला पंचायत समिती माजी सभापती बंडूभाऊ वैद्य यांच्या निदर्शनास आले. यावेळी ही ट्रॅव्हल्स पेडगाव गावातून शेलुबाजार कडे निघालेली होती वैद्य यांनी समय सूचकता व तात्काळ मोटरसायकल घेऊन या गाडीचा पाठलाग केला व तऱ्हाळा या गावांमध्ये ट्रॅव्हल्स चालकाला सूचना कडून गाडी थांबवण्याची विनवणी केली त्यानंतर चालकाच्या लक्षात आणून दिले की गाडीचा टायर जळालेला आहे याच्यामुळे संपूर्ण गाडी क्षणात पेट घेऊ शकते यांच्या या सूचनेमुळे या ट्रॅव्हल्स मध्ये प्रवास करणारे 40 ते 50 प्रवासी काही वेळातच ट्रॅव्हलच्या खाली उतरले तसेच पाणी घेऊन या टायरची आग विझवण्यात आली यावेळी विझवताक्षणी हा टायर फुटला महाराष्ट्र ट्रॅव्हल्स चालकाने फुटलेला टायर काढून त्या जागी दुसरा टायर बसवण्याचा प्रयत्न केला यावेळेस पंचायत समिती माजी सभापती यांच्या समयसुचकतेमुळे आज या ट्रॅव्हल्स मधील 50 प्रवाशांचे प्राण वाचलेले आहे. यावेळी तराळा या गावातील नागरिकांनी घटनास्थळावर ही घटना पाहण्याकरिता एकच गर्दी केली होती.पंचायत समिती माजी सभापती बंडूभाऊ वैद्य व यांच्या साथीदाराचे परिसरात कौतुक करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *