जामखेडच्या पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या धडक कारवाईचे सर्व स्थरातून कौतुक
जामखेड तालुक्यातील
फक्राबाद येथे दि.३१ मे रोजीच्या मध्यरात्री पडलेल्या दरोडा प्रकरणातील आरोपींना पकडण्यात जामखेडचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी व त्यांच्या पोलिस टीमला यश मिळाले असून या पोलीसांच्या कार्याचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.
तालुक्यातील फक्राबाद येथे दि.३१ मे रोजीच्या मध्यरात्री झालेल्या जबरी दरोड्यात कौशल्या आण्णासाहेब आढाव मैनाबाई पारे भाऊ अंगद आढाव हे अंगणात झोपलेले असता रात्री 1 वाजण्याच्या सुमारास ३ ते ४ तोंडाला रुमाल बांधलेल्या अनोळखी इसमांनी अंगद मैनाबाई आणि कौशल्या यांना कोयता, गज, काठीने जबरी मारहाण केली. त्यावेळी मैनाबाई ही त्यांस सोडवायला गेली असता तीलाही मारहाण केली तसेच कौशल्या आढाव या फिर्यादी महिले सह तिच्या आईला देखील २ अनोळखी इसमांनी मारहाण केली. सामानाची उचकापाचक करुन फिर्यादी तसेच फिर्यादीचे बहिन व आई यांचे अंगावरील एकुण १,४०,००० रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने, १०,००० रुपये किंमतीचा मोबाईल व ४०,०००
रुपये रोख असे एकुण १,९०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जबरीने चोरी करत या चोरट्यांनी पलायन केले होते याप्रकरणी जामखेड पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आला होता
सदर गुनह्याच्या तपास करताना जामखेड पोलिसांना गोपनिय माहीती मिळाली की, सदरचा गुन्हा कुणाल राजू भोसले रा. राशिन ता. कर्जत याच्यासह दोन विधीसंघर्षीत बालक यांनी व त्यांच्या इतर ४ ते ५ साथीदारांनी केला आहे त्या माहितीच्या आधारे जामखेड पो स्टे चे पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे, पोना. रविंद्र वाघ, पोकॉ. योगेश दळवी, दिपक बोराटे, जिब्राईल शेख, गणेश ढोबळे यांच्या पथकासह कर्जत पोलीस स्टेशनचे पोकॉ. दिपक कोल्हे व अर्जुन पोकळे यांच्या मदतीने राशीन गावात कुणाल राजू भोसले त्याचे २ साथीदार विधीसंघर्षीत बालक यांना पोलीसांनी ताब्यात घेतले असता त्यांनी सदरचा गुन्हा इतर ४ ते ५ साथीदारांचे मदतीने केला असल्याची कबुली दिली आहे

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, कर्जत विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस स्टेशनचे पो नि दशरथ चौधरी व त्यांच्या पोलिस टीमने केली. पुढील तपास पोकॉ. तुकाराम सोनवणे हे करित आहेत.
नंदू परदेशी
जिल्हा प्रतिनिधी अहिल्या नगर
मो नं 9765886124
