जामखेड : तालुक्यातील मोहा
हद्दीतील तसेच शहर परिसरातील अवैध कलाकेंद्रांवर तातडीने कारवाई करावी. या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाचे युवा जिल्हाध्यक्ष सचिन दत्तात्रय आजबे हे जामखेड तहसील कार्यालयासमोर सोमवार दि.८ जुन पासून आमरण उपोषणास बसले आहेत. दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरू आहे.

याबाबत तहसीलदार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच संबंधित प्रशासनाकडे स्मरणपत्र सादर करण्यात आले आहे. या स्मरणपत्रात म्हटले आहे की गेल्या तीन वर्षांपासून जामखेड परीसरातील अवैध कलाकेंद्रांबाबत विविध स्तरांवर तक्रारी व अर्ज करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप आजबे यांनी केला आहे. मोहा हद्दीतील संबंधित कलाकेंद्र निवासी व वाणिज्य परवाना न घेता सुरू असून शेतीच्या जागेचा बेकायदेशीर वापर केला जात आहे. राज्य महामार्गाच्या नियमांचे उल्लंघन करून रस्त्यालगत अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित ठिकाणी वेश्या व्यवसाय, मद्यप्राशन व मद्यविक्रीसह विविध बेकायदेशीर प्रकार
सुरू असून त्यामुळे जामखेड शहर व परिसरातील गावांच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचत असल्याचे स्मरणपत्रात म्हटले आहे. यापूर्वी ७ मे २०२६ रोजी सादर केलेल्या अर्जाची कोणतीही दखल घेण्यात आलेली नसल्याचे नमूद करत,
सामाजिक कार्यकर्ते सचिन आजबे यांचे दुसऱ्या दिवशीही आमरण उपोषण सुरू असून त्यांची तब्येत खालवली आहे. उपचारासाठी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तरी पण त्यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे.
दरम्यान, या प्रकरणात स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या जीवितास कोणतीही हानी झाल्यास त्यास संबंधित कलाकेंद्र मालक व प्रशासन जबाबदार राहील, असेही त्यांनी स्मरणपत्रात नमूद केले आहे. आता प्रशासन या उपोषणाची कशी दखल घेतील हे पहाणेच उचीत ठरणार आहे.
नंदु परदेशी
जिल्हा प्रतिनिधी अदिल्यानगर
मो नं 9765886124
