विद्यार्थ्यांच्या सुप्त क्षमतांना जागृत करून त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने ‘सुपर सेन्स अॅक्टिव्हेशन’ या वैशिष्ट्यपूर्ण प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विकासनगर (जामखेड) येथे रविवारी (दि. ७) ५ ते १५ वयोगटातील मुलांसाठी ‘सुपर सेन्स अॅक्टिव्हेशन’चा प्रयोग घेण्यात आला.

पालकांना या प्रशिक्षणाचे दीर्घकालीन फायदे सांगताना सुरेशकुमार गर्जे म्हणाले, की मानवी जीवनात अंतर्ज्ञान म्हणजे योग्य क्षणी योग्य विचार करण्याची अद्भुत आणि नैसर्गिक क्षमता होय. प्रत्येक बालकाच्या अंतरंगात दडलेल्या या विलक्षण शक्तीला योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव व सकारात्मक वातावरण मिळाल्यास ती अधिक विकसित होऊ शकते. याच संकल्पनेवर आधारित या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना मनाची एकाग्रता, आत्मविश्वास, सर्जनशीलता, निरीक्षणशक्ती आणि संवादकौशल्य विकसित करण्याची माहिती दिली. पाच ते पंधरा वर्षे हा बालकांच्या मानसिक, बौद्धिक आणि भावनिक विकासाचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळात मेंदूची ग्रहणशक्ती अधिक तीव्र असते. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होतो. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती अधिक प्रभावी बनते, आत्मविश्वास दृढ होतो, निर्णयक्षमता विकसित होते, सर्जनशील विचारांना चालना मिळते, संवादकौशल्य अधिक प्रभावी बनते, शैक्षणिक प्रगतीत सकारात्मक वाढ दिसते. सामाजिक व कौटुंबिक संबंध अधिक सुदृढ होतात,

सुप्त गुण, कला व प्रतिभांचा विकास होतो, विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये अमर्याद क्षमता दडलेली आहे. योग्य प्रशिक्षण, सातत्यपूर्ण सराव आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या साहाय्याने ही क्षमता उजागर होऊ शकते. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण करून त्याचा आपल्या भावी आयुष्यात उपयोग करून घ्यावा, असे आवाहन गर्जे यांनी केले.

नंदू परदेशी
जिल्हा प्रतिनिधी अहिल्यानगर
मोनं 9765886124

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *