प्रतिबंधित ड्रग्ज इंजेक्शनचा मोठा साठा जप्त, एकाला अटक; तर मुख्य आरोपी फरार

पोलीसांच्या धाडसी कारवाईचे सर्व स्तरातुन कौतुक

अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुग्मका यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजगाव पोलिसांनी मानवी आरोग्यास अपायकारक आणि विक्रीस प्रतिबंधित असलेल्या ड्रग्ज इंजेक्शन विरोधात मोठी कारवाई केली आहे. कारवाईत ५८,६४० रूपयांचे ७ इंजेक्शन जप्त करण्यात आले असून, या धडाकेबाज कारवाईचे परिसरात कौतुक होत आहे.

पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, बाभूळगाव खालसा, ता. कर्जत येथील पप्पू उर्फ प्रविण लाला भोसले हा MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP या नावाचे इंजेक्शन बेकायदेशीरपणे विक्रीसाठी पुरवतो. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्रीस बंदी असलेल्या या इंजेक्शनचा गैरवापर नशेसाठी आणि जिममध्ये स्टॅमिना वाढविण्यासाठी होतो.

सापळा रचून कारवाई

माहितीच्या आधारे पोलिसांनी बाभूळगाव खालसा येथे सापळा रचून रोहन भाऊसाहेब लाढाणे, वय २२ याची झडती घेतली. त्याच्याकडून संबंधित इंजेक्शन सापडल्यानंतर मुख्य आरोपी प्रविण भोसले याच्या घराची झडती घेण्यात आली. या कारवाईत एकूण

गुन्हा दाखल, एक फरार

या प्रकरणी रोहन लाढाणे आणि प्रविण उर्फ पप्पू लाला भोसले यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, १२५, २७८ तसेच औषषीद्रव्य व सौंदर्य प्रसाधन अधिनियम १९४० मधील कलम १८ (सी), २४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन लाढाणे अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी प्रविण भोसले सध्या फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे.

सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या पथकांने केली आहे.

मिरजगाव पोलीस ठाणे मा. कर्जत र अतिभार

नागरिकांचे समाधान, पोलिसांचे आवाहन

या कारवाईबद्दल मिरजगाव व बाभूळगाव खालसा परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. अशा प्रकारच्या प्रतिबंधित ड्रग्ज किंवा अमली पदार्थींची विक्री होत असल्याची माहिती नागरिकांनी तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन मिरजगाव पोलीस स्टेशनकडून करण्यात आले आहे.

चौकट

जिल्ह्यातील प्रविबंधित ड्रग्ज इंजेक्शनची ही पहिलीच कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. अनेक मैडिकल दुकानदार सरसाणे या ड्रग्जची विक्री करतात. या कारवाईमुळे मैडिकल व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड सह त्यांच्या सर्व पोलीस टीमचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे

नंदू परदेशी
जिल्हा प्रतिनिधी अहिल्यानगर
मो नं 9765886124

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *