राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त तसेच अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त तालुक्यातील चौंडी येथे समस्त चोंडी ग्रामस्थ व व विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लेक-जावयांचा भव्य धोंडेजेवण व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार, दि. १४ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पावन जन्मभूमी चौंडी येथे हा आगळावेगळा सांस्कृतिक आणि कौटुंबिक स्नेहसोहळा पार पडणार आहे. ग्रामीण संस्कृतीत अधिक मास निमित्त लेक-जावयांना सन्मानपूर्वक आमंत्रित करून त्यांचे आदरातिथ्य करण्याची परंपरा आहे. या परंपरेचे जतन करण्याच्या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा केवळ एक कार्यक्रम नसून लेक आणि जावई यांच्याप्रती असलेली कृतज्ञता, प्रेम, जिव्हाळा आणि सन्मान व्यक्त करणारा आपल्या समृद्ध संस्कृतीचा आणि परंपरेचा उत्सव आहे. कौटुंबिक नातेसंबंध अधिक दृढ करण्याबरोबरच सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे महत्त्व या कार्यक्रमातून साध्य होणार आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श समाजापुढे ठेवत त्यांच्या जन्मभूमीत आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहसंमेलनात लेक-जावयांचा पारंपरिक पद्धतीने सत्कार करण्यात येणार असून विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच उपस्थितांना सांस्कृतिक वारसा, कौटुंबिक मूल्ये आणि सामाजिक बांधिलकी यांचा संदेश देण्यात येणार आहे. या ऐतिहासिक आणि संस्कारमय सोहळ्यास तालुक्यातील तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. हा समारंभ रविवार, दि. १४ जून २०२६ चोंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर वेळ: सकाळी १० वाजता आपली उपस्थिती हीच या सोहळ्याची खरी शोभा ठरेल, असे आवाहन समस्त ग्रामस्थ चौंडी व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नंदु परदेशी
जिल्हा प्रतिनिधी अहिल्यानगर
मो नं 9765886124

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *